बंधार्‍यांच्या फळ्यांसाठी 29 लाख मंजूर - तनपुरे

बंधार्‍यांच्या फळ्यांसाठी 29 लाख मंजूर - तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) तालुक्यातील मुळा नदीवरील (Mula River) मानोरी (Manori), मांजरी (Manjari) व वांजुळपोई (Walunjpoi) तसेच शेवगांव (Shevgav) तालुक्यातील सामनगाव (Samangav), वाघोली (Wagholi) व वडुले बु. (Vadule) येथील कोल्हापूर (Kolhapur) पद्धतीच्या बंधार्‍यांच्या फळ्यांसाठी रबर सील घेण्यासाठीच्या कामास जलसंपदा विभागाने मंजूरी (Approved by Water Resources Department) दिली असून यासाठी 29 लक्ष 65 हजार रुपयांचा निधी वर्ग केला असल्याची माहिती माजी खा.प्रसाद तनपुरे (Former MP Prasad Tanpure) यांनी दिली.

तनपुरे म्हणाले, राहुरी तालुक्यातील मानोरी, मांजरी व वांजुळपोई तर शेवगांव तालुक्यातील सामनगांव, वडुले बु. व वाघोली येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍याच्या फळ्यांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. या फळ्यांना वापरण्यात येणारे रबर सील तुटलेले असून काही फळयांना तर रबर सिलच नसल्यामुळे त्यामधून सातत्याने पाण्याची गळती होते. परिणामी बंधारे लवकर रिक्त होऊन पाण्याचा अपव्यय होतो. यासाठी या फळयांना नवीन रबर सील बसविणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत जलसंपदा विभागाकडे सातत्याने मागणी करून याकामासाठी 29 .65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन तो संबंधित विभागाकडे वर्गही करण्यात आलेला आहे.

मानोरी बंधार्‍यासाठी 167, वांजुळपोईसाठी 308, मांजरीसाठी 432, शेवगांव तालुक्यातील सामनगांवसाठी 126, वडुले बु.साठी 167 तर वाघोलीसाठी 133 अशा एकूण 1333 रबर सील बसविण्याच्या कामास लवकरच सुरूवात करण्यात येऊन बंधार्‍यांमध्ये पाणी अडविण्यापूर्वीच हे काम पूर्ण होणार असल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.