माजी आमदार वैभव पिचड करोना संक्रमित

माजी आमदार वैभव पिचड करोना संक्रमित
वैभव पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

भाजपचे अनुसूचित जमातीचे राष्ट्रीय मंत्री व अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड हे करोना संक्रमित झाले आहेत. त्यांचेवर प्रथम अकोले येथील डॉ. भांडकोळी यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान पुढील उपचारार्थ शनिवारी सायंकाळी सहा वाजता ते मुंबईकडे रवाना झाले. मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये ते पुढील काही दिवस उपचार घेणार आहे.

माजी आमदार वैभवराव पिचड 'सार्वमत' शी बोलताना म्हणाले की-अकोले नगरपंचायत निवडणुकीत सातत्याने मतदारांशी संपर्क साधत असताना माझ्याकडुन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक होते त्यात त्रुटी राहिल्याने मी आज सकाळी पॉझीटीव्ह निघालो आहे. आज तातडीने राजूर येथील डॉ.बाबासाहेब गोडगे, डॉ.दिघे व अकोले येथील हरिश्चंद्र रुग्णालयात डॉ.भांडकोळी यांचेकडून तपासण्या केल्या आहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मी तातडीने मुंबई येथे जात आहे.

माझ्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या असतील त्यांनी तातडीने आपली ही तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्याव. तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या मध्ये परत येऊन पुन्हा तालुक्याच्या प्रश्नात लक्ष्य घालेल. तर करोना व ओमायक्रोन संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असून प्रत्येकाने आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी.

नगरपंचायत निवडणुकीत भाजप उमेदवाराणां जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता होऊ घातलेल्या चार प्रभागातील मतदारांनीही भाजप-रिपब्लिकन युतीच्या उमेदवारांना मतदान करून आपले आशीर्वाद द्यावेत असे साकडे पिचड यांनी अकोलेकरांना घातले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com