उजनी उपसा सिंचन योजना अंतर्गत तलाव गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे - स्नेहलता कोल्हे

उजनी उपसा सिंचन योजना अंतर्गत तलाव गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे  - स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्याच्या पश्चिमेच्या भागाला वरदान असलेल्या उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्व तलाव गोदावरी उजव्या कालव्याच्या ओव्हरफ्लो पाण्याने भरून द्यावेत अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे

सौ. कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे, तालुक्यात चालू वर्षी बहुतांश ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे. सध्या नाशिक त्रंबकेश्वर भागात चांगल्या प्रमाणात पाऊस होत असल्याने गोदावरी नदीला व कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. उजनी उपसा सिंचन योजनेच्या धोंडेवाडी, वेस, सोयगाव, मनेगाव, अजनापूर हे तलाव भरून मिळावेत म्हणून या भागातील शेतकर्‍यांनी आपल्याकडे मागणी केलेली आहे.

हे सर्व तलाव पूर्णपणे भरून मिळाले तर या परिसरातील शेतकर्‍यांना काही प्रमाणात लाभ होईल तसेच या भागातील जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होईल. तेव्हा शासनाने तातडीने या मागणीची दखल घेऊन उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्व तलाव गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे असे सौ. कोल्हे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com