शक्तीने शक्य न झाल्यास युक्तीने लढू पण आरक्षण मिळविणारच

माजी आमदार अभंग || आरक्षण ओबीसींचे’ विषयावर श्रीरामपुरात चर्चासत्र
शक्तीने शक्य न झाल्यास युक्तीने लढू पण आरक्षण मिळविणारच

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

ओबीसींना सर्वस्तरावर आरक्षण मिळालेच पाहिजे. या आरक्षणाच्या लढ्यासाठी ओबीसीमध्ये येत असलेल्या सर्वांनी एकत्र लढा उभारण्याची गरज आहे. शक्तीने शक्य न झाल्यास युक्तीने लढू, त्यासाठी सर्व जातींनी खंबीरपणे समता परिषदेचे संस्थापक माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली असून सर्वांनी एकत्र या, असे आवाहन समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले.

श्रीरामपूर येथे समता परिषदेच्यावतीने ‘आरक्षण ओबीसींचे’ या शिर्षकाखाली आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कुदळे होते तर समता परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, सुनील ससाणे, अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष सदाशिव रासकर, बंडू आनंदकर, शरद लोंढे, जालींदर कुर्‍हे, दिनकर गिरमे, दादासाहेब मेहेत्रे, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड हे व्यासपिठावर उपस्थित होते.

ओबीसीमधील प्रत्येक समाजाने एका छताखाली येऊन लढलो तर आपल्याला आरक्षणापासून कुणीही रोखू शकणार नाही. संविधानातील घटनेप्रमाणे ओबीसींना आरक्षण मिळालेले असताना आज आपल्या सवलती शून्य झाल्या आहेत, हा ओबीसींवर अन्याय आहे. यातून न्याय मिळविण्यासाठी सर्वांनी एका छताखाली येण्याची गरज आहे. यांच्याकडे ओबीसींचा एम्पीरीयल डाटा नाही तर मग त्यात सातशे चुका यांना कशा समजल्या? इतरांना आरक्षण देण्यास आमचा कुठलाच विरोध नाही पण आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. त्यासाठी घरोघरी जाऊन सर्व्हे करा आणि आमचे आरक्षण द्या, असे आवाहन समता परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पद्मकांत कुदळे यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे रवींद्र ताजणे, ज्येेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, सुभाषराव गायकवाड, दादासाहेब मेहेत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष चंद्रकांत झुरंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले तर आभार प्रकाश कुर्‍हे यांनी मानले. यावेळी तालुका व शहर कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.

यावेळी नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष संजय जगताप, क्षत्रीय बेलदार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर छल्लारे, कुंभार समाजाचे ऋषीकेश झिने, परीट समाजाचे सुनील जोर्वेकर व राजेंद्र देसाई, दीपक कदम, राजेंद्र सातभाई, रामदास शिंदे, सुरेंद्र गिरमे, प्रभाकर कुर्‍हे, सखाराम टेकाडे, विवेक गिरमे, एकनाथ दुधाळ, सुरेश खैरनार, सुरेश सोनावणे, योगेश बडधे, शरद कळमकर, बबनराव तागड, सुनील अनाप, गोरक्षनाथ बनकर, सागर भोंगळे, अनिल दोंड, राम भारस्कर, अनिल भोंडगे, सचीन राजवळ, संजय डेकरे, अरुण गमे, बाळासाहेब जाधव, सुनील पांढरे, राजीव तागड, सुनील विधाटे, साईनाथ बनकर, अनिस शेख, अमोल शेटे, ज्ञानदवे साळवे, बाळासाहेब एलम, रंजना देशमुख, अश्वीनी आहिरे, रंजना सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com