ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार पांडुरंग अभंग यांची निवड

ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार पांडुरंग अभंग यांची निवड

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (Loknete Marutrao Ghule Patil Dnyaneshwar Sahakari Sakhar Karkhana) उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग (Former MLA Pandurang Abhang) यांची नेवासा (Newasa) येथील श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे (Dnyaneshwar Temple Board of Trustees) अध्यक्षपदी निवड झाली आहे.

अभंग यांचे निवडीबद्दल लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे वतीने कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील (Former MLA Narendra Ghule Patil) यांच्या हस्ते व जिल्हा बँक व कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील (Former MLA Chandrasekhar Ghule Patil), जेष्ठ संचालक देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, विट्ठलराव लंघे यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना अभंग म्हणाले, वै.बंशी महाराज तांबे यांचे निधनानंतर १९९४-९५ मध्ये ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. २००४ मध्ये शिर्डी संस्थांनवर संधी मिळाली. त्या माध्यमातून ज्ञानेश्वर मंदिरला ५० लाख व कमानीसाठी ४.५ लाख रुपयांचा निधी आणता आला. जेष्ठ नेते विश्वासराव गडाख यांचे उपस्थितीत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाची सभा झाली. त्यात अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. अध्यक्ष पदाच्या माध्यमातून माऊलींची सेवा करण्याची समाधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. ज्ञानेश्वर मंदिर विकासात वै. बंशी महाराज तांबे व लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे मोठे योगदान आहे. ज्ञानेश्वर मंदिर हे तत्वज्ञानाचे विद्यापीठ आहे.इतर देवस्थानाचे बरोबरीने ज्ञानेश्वर संस्थानचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करू.

यावेळी काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, दादासाहेब गंडाळ, बबनराव भुसारी, पंडितराव भोसले, प्रा.नारायण म्हस्के, भाऊसाहेब कांगुणे, शिवाजी कोलते, मच्छीन्द्र म्हस्के, जनाभाऊ कदम, बबनराव जगदाळे, दीपक नन्नवरे, शंकरराव पावसे, सखाराम लव्हाळे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com