कोणी कितीही कोल्हेकुई केली तरीही पालिकेत सत्ता पुन्हा भाजपाचीच येणार

माजी आमदार चंद्रशेखर कदम; देवळाली प्रवरात भाजपाचा मेळावा ; निवडणुकीसाठी भाजपाने फुंकले रणशिंग
कोणी कितीही कोल्हेकुई केली तरीही पालिकेत सत्ता पुन्हा भाजपाचीच येणार

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

गावाने माझ्यावर खूप प्रेम केले. मला आमदारकी मिळवून दिली. माझ्यावर जनतेचा विश्वास आहे म्हणून येथील एकहाती सत्ता आमच्याकडे दिल्या. आज जनता आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे कोणी कितीही कोल्हेकुई केली आणि कितीही भूछत्रासारखे उगवले तरी काही फरक पडत नाही. येणार्‍या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले.

येथील शांताबाई कदम सांस्कृतिक भवन येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी कदम बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, भाजयुमो दक्षिण जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम, उत्तर जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष रवींद्र म्हसे, गोरख मुसमाडे, मुरलीधर कदम, शिवाजी मुसमाडे, उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, भीमराज कदम, सोसायटी अध्यक्ष राजेंद्र ढुस, अजित चव्हाण, वसंत कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्यात भाजपा शहराध्यक्ष, ओबीसी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, भाजयुमो पदाधिकारी व प्रत्येक प्रभागातून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये भाजपा ओबीसी आघाडी शहराध्यक्ष किरण लासुरकर, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष एकनाथ बनकर, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष उमरबेग, मोहसीन शेख, तुषार कदम, असिम शेख, संतोष हारदे, सुरेश साळुंखे, राजेंद्र ढुस, अनिल कदम, सचिन शेटे, राजेंद्र मुसमाडे, प्रकाश संसारे, सचिन कोठुळे, संजय सिनारे, बाळासाहेब पठारे, डॉ. उमाकांत सांगळे, मंजाबापू वरखडे, अजित खांदे, भगवान भुमकर, दीपक राऊत, गौतम भागवत, शरद होले, सुरेश साळुंके, ज्ञानेश्वर भिंगारे, संजय हुडे, सुधाकर कौसे, दिलीप गागरे, चंद्रशेखर शिंदे, किरण गायके, किशोर शेळके, गोरख धनवडे, रामेश्वर तोडमल, निलेश गायकवाड, मनोज भोंगळ, रमेश ताकटे, निलेश मुसमाडे, अक्षय संसारे, सागर खांदे, अभिजित वाळुंज, डॉ. अनिरुद्ध ठोंबरे, अभय चव्हाण, निलेश पठारे, विकास वाळुंज, योगेश शेटे, डॉ. अमोल सांगळे, संकेत महांकाळ, विठ्ठल आरंगळे, प्रविण औटी, सुयोग सिनारे, विठू राऊत, मयूर मोरे, ऋषीकेश चव्हाण, गौरव चव्हाण, अक्षय खांदे, अविनाश गाढे, राहुल मुसमाडे, किशोर कडू यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

सत्यजित कदम म्हणाले, मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील सोसायटी, नगरपालिका आदी निवडणुका लढवायच्या आहेत. निवडणूक आली की, काही भूछत्राप्रमाणे बाहेर येतात. मागीलवेळी जनतेने सोसायटी व नगरपालिकेची एकहाती सत्ता दिली. साडेतीन वर्षे लोकाभिमुख विकासकामे केली व आतापर्यंतचा सर्वात जास्त निधी आणला. आजही जनता आपल्यासोबत आहे. येथून पुढे नूतन पदाधिकार्‍यांची जबाबदारी वाढली आहे. जाणार्‍यांपेक्षा येणारांची यादी मोठी असल्याचे कदम म्हणाले.

यावेळी दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, रवींद्र म्हसे, अमोल भनगडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविक गटनेते सचिन ढुस यांनी केले. सूत्रसंचालन व आभार माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे यांनी मानले. मेळाव्यास नगरसेविका संगीता चव्हाण, सुजाता कदम, नंदा बनकर, नगरसेवक आदिनाथ कराळे, संजय बर्डे, बाळासाहेब खुरुद, ज्ञानेश्वर वाणी, सुधीर टिक्कल, शहाजी कदम, सोपान शेटे, सोपान भांड, दिगंबर पंडीत, गंगाधर खांदे, दिलीप मुसमाडे, अमोल कदम, भारत शेटे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com