महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळेच सामाजिक क्रांती - माजी आ. मुरकुटे

महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळेच सामाजिक क्रांती - माजी आ. मुरकुटे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळेच सामाजिक क्रांती झाली. त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षण व ज्ञानामुळेच बहुजन समाजात परिवर्तन घडेल, अशी त्यांची धारणा होती. शेती क्षेत्राची त्यांनी अर्थशास्त्रीय मांडणी केली. शेतकर्‍यांची दूरवस्था तसेच पाणी प्रश्नाबाबत त्यांनी ब्रिटिश सरकारचे कान टोचले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी त्या माध्यमातून समाज प्रबोधनाची चळवळ उभी केली. महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या सामाजिक पिछेहाटीच्या काळात अधिक गरज आहे, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने श्रीरामपूर येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री. मुरकुटे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अ‍ॅड. सुभाष चौधरी, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका मंजुश्री मुरकुटे, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, शिवसंकल्प सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहन डावखर, कारेगाव भाग कंपनीचे संचालक संजय लबडे, अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण, संदीप डावखर, बाळासाहेब गोराणे, विराज आंबेकर, विजय शेलार, नितीन क्षीरसागर, विशाल धनवटे, अनिल कुलकर्णी, रोहित मालकर, ज्ञानदेव वर्पे, विश्वनाथ शेजुळ, वैभव सुरडकर, राधु पटारे, प्रदीप जाधव, जयेश परमार, बबन गायकवाड, संजय वाघमारे, नदीम बागवान, सुरेश जाधव, संजय मोरगे, अन्वर शेख आदी उपस्थित होते.

अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरही महात्मा जोतिबा फुले यांचे जयंतीनिमित्त व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी प्रतिमा पूजन करुन अभिवादन केले. यावेळी अशोक कामगार पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, कार्यकारी संचालक संतोष देवकर, विश्वनाथ लवांडे, अण्णासाहेब वाकडे, संतोष शेळके, बबन पटारे आदी उपस्थित होते. अशोक शैक्षणिक संकुलातही म. फुले जयंती साजरी करण्यात आली.

Related Stories

No stories found.