श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

माजी आ. भानुदास मुरकुटे सध्या कोणत्याच पक्षात नसल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, अशी ऑफर आमदार लहू कानडे

यांनी ना. बाळासाहेब थोरात यांच्यासमोर दिल्याने उपस्थितीतांच्या भुवया उंचावल्या.

ना. बाळासाहेब थोरात हे काल केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलनप्रसंगी आले होते. आंदोलनानंतर ते माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याघरी फलाहारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना आ. कानडे यांनी काँग्रेेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, ज्ञानदेव वाफारे उपस्थित होते.

आ. कानडे यांच्या निमंत्रणावर बोलताना आ. मुरकुटे यांनी, काँग्रेसमध्ये येऊन काय करता, ना. बाळासाहेब थोरात हे या अगोदरच राष्ट्रवादीत आले असते. परंतु त्यांनी मला अंधारात ठेवत ते काँग्रेसमध्ये राहिले आणि मला राष्ट्रवादीतच ठेवले. त्यावेळी त्यांनी माझी फसवणूक केली, असा गौप्यस्फोट केला. त्यावर मी आलो असतो, मात्र वडिलांनी विरोध केला होता, असे स्पष्ट करत ना. थोरात यांनी चर्चेला पुर्णविराम दिला.