माजीमंत्री कोल्हेंनी दिले साखर आयुक्तांना कारखानदारीचे धडे

माजीमंत्री कोल्हेंनी दिले साखर आयुक्तांना कारखानदारीचे धडे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सहकारी साखर कारखानदारी (Cooperative Sugar Factory) ही ऊसशेती व शेतकर्‍यांचा जीव की प्राण आहे, तेव्हा खुल्या अर्थव्यवस्थेत सहकार टिकला पाहिजे त्यासाठी आपल्या समर्थ ज्ञानाची राज्यातील शेतकर्‍यांना गरज असून त्यांनुरूप राज्यातील अन्य कारखान्यांना शिकवण द्यावी अशा शब्दांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे (Former Minister Shankarrao Kolhe) यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांना कारखानदारीचे धडे दिले.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने (Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Cooperative Sugar Factory) पॅरासिटामॉल औषध निर्मिती (Paracetamol drug production) क्षेत्रात पाऊल टाकले असून त्याच्या अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळेच्या उद्घाटनाच्यानिमित्त साखर आयुक्त गायकवाड बुधवारी संजीवनी कारखाना (Sanjeevani factory) कार्यस्थळी आले असता त्याप्रसंगी शंकरराव कोल्हे यांच्याशी त्यांनी वार्तालाप साधला.

याप्रसंगी अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, तज्ञ संचालक विवेक कोल्हे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. साखर उद्योगातील पितामह म्हणून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची ओळख असून त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला कसा फायदा होईल म्हणून साखर आयुक्त शंकर गायकवाड यांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com