माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी

जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची प्रदेशाध्यक्ष पाटील विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे मागणी
माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकीत पक्ष मजबूत करण्यासाठी माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी गळ नगर भाजप जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे.

मे व जून महिन्यांत होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी संघटनात्मक पातळीवर करण्यात आली आहे. राज्याच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्याच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, असा ठराव मांडला होता. हा ठरावाही यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील व विरोधीपक्ष नेते फडणवीस यांच्याकडे देण्यात आला.

याप्रसंगी दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सचिन पोटरे, नितीन दिनकर, सुनील पवार, अशोक पवार, गणेश पालवे, पप्पू गोधड आदींसह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा घेत आगामी निवडणुकी संदर्भात विस्तृत स्वरुपात चर्चा केली.

विधानसभानिहाय माहिती घेत जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात येऊन दोन विधानसभानिहाय संयुक्त बैठका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत तीन जिल्हाध्यक्षांना माहिती संकलित करून, अहवाल तयार करावे, असेही सूचविण्यात आले.

Related Stories

No stories found.