...तर पुन्हा एकदा धरणाचे चाक बंद आंदोलन करू

...तर पुन्हा एकदा धरणाचे चाक बंद आंदोलन करू

अकोले |प्रतिनिधी| Akole

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या वडिलांचे नाव जसे मुंबई विमानतळाला दिले, त्याप्रमाणे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे (Proto-revolutionary Raghoji Bhangre) हे आमच्या समाजाचे वडील आहेत. भंडारदरा धरणाला (Bhandardara Dam) त्यांचे नाव द्यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्यावतीने (Tribal society) करत आहोत. जर सरकारने भंडारदरा धरणाला क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव दिले नाही तर पुन्हा एकदा धरणाचे चाक बंद आंदोलन (Movement) हाती घ्यावे लागेल, असा इशारा माजी मंत्री मधुकरराव पिचड (Hint Former Minister Madhukarrao Pichad) यांनी सरकारला दिला आहे.

भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरात आदिवासी संघटना व समाजाने एकत्र येत पारंपारिक वाद्य गजरात व राघोजी भांगरे (Raghoji Bhangre) यांचा जयजयकार करत धरण स्थळावर येऊन क्रांतिवीर राघोजी भांगरे (Krantiveer Raghoji Bhangre) यांच्या नामकरण फलकाचे अनावरण माजी मंत्री पिचड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सभापती सौ. उर्मिला राऊत, सौ. हेमलताताई पिचड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सचिव यशवंत आभाळे, खजिनदार एस. पी. देशमुख, ज्येष्ठ नेते सुधाकर देशमुख, रावसाहेब वाकचौरे, आदिवासी उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भरत घाणे, सचिव मंगलदास भवारी, माधव गभाले, सी. बी. भांगरे, पांडुरंग खाडे, सयाजी अस्वले, कमल बांबले, भाऊसाहेब वाकचौरे, नरेंद्र नवले, सुशांत वाकचौरे, शाम वाकचौरे, अमोल येवले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री पिचड (Former Minister Madhukarrao Pichad) म्हणाले, आज 9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिन (Tribal Pride Day) याच दिवशी महात्मा गांधीजींनी (Mahatma Gandhi) इंग्रजांना ‘चले जाव’ ची घोषणा दिली. तर याच दिवशी ‘विल्सन चले जाव’ (Wilson go away) ही घोषणा आपण देऊन महाराष्ट्रातील आदिवासींच्या हृदयात कोरलेले क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव भंडारदरा धरणाला देत असल्याची घोषणा केली.

पूर्वी चाक बंद करून अकोले (Akole), संगमनेरच्या (Sangamner) हक्काचे पाणी वाटप (Allocation of rightful water) करून न्याय दिला. आज पुन्हा न्याय्य मागणीसाठी ते आंदोलन हाती घ्यावे लागेल असेही पिचड यांनी सांगितले.

या प्रसंगी भाजपचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभव पिचड (Former MLA Vaibhav Pichad) यांनी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव भंडारदरा धरणाला देणे योग्यच असून येथील आदिवासी धरणात विस्थापित झाला. जल, जंगल, जमीन त्यांचा हक्क दार असून त्यांच्या पूर्वजांचे नाव धरणाला का नको, तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वांच्या मागणीमुळे आज आम्ही विल्सन जलाशयाला क्रांतिवीर राघोजी भांगरे हे नाव देत आहोत. पोलिस प्रशासनाने मला 149 ची नोटीस दिली असली तरी आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी जेल मध्ये जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही ही मागणी केल्याने विरोधकांच्या पोटात गोळा आल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला मात्र सरकार तुमचे आहे, आम्ही मागणी करून सरकारचे लक्ष वेधले आहे. यात राजकारण आणू नका, राजकीय आखाड्यात खुप काही बोलता येईल मात्र व्यक्तिद्वेषातून आदिवासींच्या हिता आड येऊ नका, असे ही त्यांनी विरोधकांना सुनावले.

यावेळी उपसभापती दत्तात्रय देशमुख, भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे, प्रा. डॉ. सुनिल घनकुटे, सुनिल सारोकते, जयराम इदे, संपत झडे, गंगाराम धिंदले आदिंची भाषणे झाली. प्रास्तविक काळू गोडे यांनी केले. प्रारंभी तीन तास मिरवणूक झाल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांना लेखी निवेदन देऊन धरणाच्या भिंतीवर जाऊन क्रांतिवीर राघोजी भांगरे धरण असा फलक लावण्यात आला.

वाघ म्हातारा झाला म्हणजे गवत खातो का? असा सवाल माजी मंत्री पिचड यांनी करत यापुढेही संघर्षाची लढाई सुरुच ठेऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला, तेव्हा उपस्थितांनी ‘पिचड साहेब... वैभव भाऊ, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा दिल्या.

मिरवणूक सुरू असताना आमदार डॉ. किरण लहामटे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह येथून जात असताना घोषणाबाजी सुरू झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. तर सरकार दोन हजार रुपयांचा किराणा खावटी कर्ज म्हणून देते मात्र ते केवळ 1300 रुपयाचे साहित्य असून ठेकेदार, पुढारी, अधिकारी एका कीटमध्ये 700 खिशात घालत असल्याचा आरोप पिचड यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com