माजी नगरसेवकाची अनाधिकृत इमारत होणार जमीनदोस्त

बांधकाम पाडण्याचे महापालिका उपायुक्तांचे आदेश
माजी नगरसेवकाची अनाधिकृत इमारत होणार जमीनदोस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पालिका कर्मचारी तसेच माजी नगरसेवक असलेल्या मुदगल कुटुंबियांचे सर्व बांधकाम अतिक्रमण व अनाधिकृत ठरवून ते पाडण्याचा आदेश महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी दिला आहे. या अतिक्रमण विरोधातील तक्रारदार अ‍ॅड.गजेंद्र दांगट यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे.

माजी नगरसेवकाची अनाधिकृत इमारत होणार जमीनदोस्त
नगर जिल्ह्यात काँग्रेसचे 17 मतदार

पालिका कर्मचारी बाबू मुदगल व मुदगल कुटुंबीय यांनी सि.स.नं. 7499 आणि 6052 या जागेवर कोणतीही परवानगी न घेता तीन मजली आरसीसी बांधकाम केले. या इमारतीमध्ये त्यांनी अवैधरित्या भाडेकरी टाकले होते. तर महापालिकेची मोठ्या प्रमाणात घरपट्टी बुडवून त्यापुढील येण्याजाण्याच्या रस्त्यात मोठ्या आकाराचा ओटा बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याची तक्रार अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांनी महानगरपालिकाकडे केली होती.

माजी नगरसेवकाची अनाधिकृत इमारत होणार जमीनदोस्त
श्रीरामपुरात इन्स्टाग्रामवरून धार्मिक भावना भडकावल्या; युजरवर गुन्हा

याप्रकरणी मनपा उपायुक्त यांच्याकडे झालेल्या सुनावणीमध्ये मुदगल कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाले. मुदगल कुटुंबीयांनी स्वतः हून सर्व बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा महानगरपालिके मार्फत पाडण्यात येईल. यासाठी झालेला खर्च वसूल करण्यात येईल, असा आदेश उपायुक्तांनी दिला आहे.

माजी नगरसेवकाची अनाधिकृत इमारत होणार जमीनदोस्त
हार्वेस्टरने ऊस तोडणी केल्यास पाचटाचे वजन होणार वजा

मुदगल परिवाराने आणखी एका प्रकरणात कल्याण रोडवर पालिका ओपन स्पेस तसेच महामार्गावरील जागा बळकावून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. तर पत्र्याचे शेड टाकले आहे. यातून त्यांना लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. याशिवाय अजून एका प्रकरणी तहसीलदार यांच्याकडे सुनावणी सुरु आहे. इतके मोठे अतिक्रमण असतानाही मुदगल परिवारातील व्यक्ती 15 वर्ष नगरसेवक होती, यासंबंधी त्यांना पाठीशी घालणार्‍या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची शासनाकडे मागणी करणार आहे.

- अ‍ॅड. गजेंद्र दांगट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com