माजी नगरसेवक जाधव पुन्हा शिवसेनेत

माजी नगरसेवक जाधव पुन्हा शिवसेनेत

नार्वेकर यांच्या पुढाकारातून मातोश्रीवर बांधले शिवबंधन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिवसेनेपासून दुरावलेले माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव यांचे पती सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले आहेत. बुधवारी मातोश्रीवर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत जाधव यांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, मदन आढाव यावेळी उपस्थित होते.

स्व. अनिल राठोड यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक असलेले सचिन जाधव यांनी 2018 च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडत बहुजन समाज पार्टी कडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत पत्नी अश्विनी यांच्यासह चारही नगरसेवक त्यांनी निवडून आणत आपली राजकीय ताकत दाखवून दिली. युवा सेनेचे प्रमुख राठोड यांनी गत आठवड्यातच शिवसेना सोडून गेलेल्यांची घरवापसी होणार असल्याचे सुतोवाच केले होते, त्याची सुरुवात जाधव यांच्यापासून झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com