बनावट कागदपत्राद्वारे लष्करात भरती
जेरबंद

बनावट कागदपत्राद्वारे लष्करात भरती

भिंगार पोलिसांकडून तरुणाला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट रहिवासी दाखला तयार करून त्या आधारे लष्करात भरती झालेल्या तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. सचिन ओमपाल (वय 19 रा. बाडी, ता. सिदौली, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ओमपालविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.

लष्कराच्या बीएमआर रेजिमेंटचे अधिकारी साई स्वरुप जेना (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी ओमपाल हा ऑक्टोबर 2020 मध्ये उत्तर प्रदेश येथे सैन्यदलात भरती झाला होता. त्याची प्रारंभी बरेली (उत्तरप्रदेश) व नंतर नगरच्या डीएमआर रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली होती. लष्करात भरती होत असताना तो बाडी (ता. सिदौली) या गावचा रहिवासी असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे दिली होती. मात्र लष्कराने केलेल्या तपासणीत तो बाडी गावचा रहिवासी नसून त्याने बनावट रहिवासी दाखला सादर केल्याचे निष्पन्न झाले. सैन्य दलाची फसवणूक केल्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com