
करंजी | पाथर्डी
तालुक्यातील करंजी घाट परिसरातील वनविभागाच्या जंगलाला शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नगरमाचाड परिसरात आग लागली त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने ही आग झपाट्याने संपूर्ण जंगल परिसरात पसरली.
वनविभागाचे कर्मचारी अधिकारी देखील काही वेळात घटनास्थळी पोहोचले आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला परंतू सायंकाळी सात वाजेपर्यंत देखील जंगलाला लागलेली आग आटोक्यात आली नव्हती. या आगीमुळे जंगलातील अनेक झाडेझुडपे जळून खाक झाली असुन वन्य प्राण्यांची देखील मोठी जीवित हानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
वनविभागाने गेल्या दोन वर्षापासून दगडवाडी, नगरमाचाड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे आणि नेमकी याच भागात हा आग लागली जात असल्याने निमकी आग लागली का लावली ? याबाबत देखील आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील हा विषय मोठा गांभीर्याने घेतल्याचे समजले आहे.
मागील वर्षी देखील क्षेत्रे, भावले वस्ती परिसरातील जंगलाला आग लागून वन विभागाचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी एप्रिल अखेर करंजीघाट परिसरात लागलेल्या या आगीमुळे घाट परिसरातील जंगलाचे देखील मोठे नुकसाण या आगीमुळे झाले आहे. आग विझवण्याचे काम अद्याप पर्यंत सुरू असल्यामुळे नेमकी किती हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले याची माहिती देणे शक्य नसल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जंगलाला आग लागल्याची माहिती समजली त्यानंतर दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांसह दोन फायर मशिन आग विझविण्याचे काम करत असून नेमकी किती हेक्टर क्षेत्र जळाले हे अद्याप सांगणे कठीण आहे. आग लागली की लावली याबाबत देखील वन विभाग शोध घेणार आहे.
दादासाहेब वाघुलकर ( वनपरिक्षेत्र अधिकारी तिसगाव)