वनविभागाच्या अधिकार्‍याकडून गारगोटी विकणे व्यवसायाला मज्जाव

वनविभागाच्या अधिकार्‍याकडून गारगोटी विकणे व्यवसायाला मज्जाव

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य (Kalsubai Harishchandragad Sanctuary) क्षेत्रात घाटघर (कोकण कडा) येथे एका वयोवृद्ध आदिवासी इसमाला वनविभागाच्या (Forest Department) एका वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍याने गारगोटी विकण्याच्या व्यवसायाला मज्जाव करत जातीवाचक शिवीगाळ करण्याची निंदनीय घटना घडली आहे.

गेल्या सात ते आठ वर्षापासून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महादु रावजी खडके हा वयोवृद्ध आदिवासी इसम परिसरातून छोटे मोठे रंगीबेरंगी दगड (Small to large colored stones) (गारगोटी) जमा करुन घाटघर (Ghatghar) येथील कोकणकड्यावर विक्री करण्याचा छोटासा व्यवसाय करत आहे. मात्र काल दुपारच्या दरम्यान वनविभागाची गाडी कोकणकड्यावर आली. दोन अधिकार्‍यांनी महादु रावजी खडके विक्री करत असलेले दगड गोटे उचलुन कोकणकड्यावर खाली टाकून देत जातीवाचक शिवीगाळ केली व दम दिला.

अशी कैफियत खडके यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोकराव भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, सरपंच दिलीपराव भांगरे यांच्याकडे मांडत न्यायाची मागणी केली. तर यासंदर्भात शेंडीचे सरपंच दिलीपराव भांगरे यांनी आक्रमक भूमिका घेत वनविभागाची मनमानी वाढली असून आदिवासींवर झालेला अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com