वनविभागाने जप्त केलेल्या म्हैसगावच्या मुद्येमालावर चोरांनी मारला डल्ला

वनविभागाने जप्त केलेल्या म्हैसगावच्या मुद्येमालावर चोरांनी मारला डल्ला

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील म्हैसगांव येथे वनविभागाने जप्त केलेला 12 हजार रुपये किंमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना दि. 1 मे रोजी घडली. या घटनेमुळे वन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

राहुरी तालुक्यातील म्हैसगांव येथे वनविभागाने मोटार, पत्रे, लोखंडी गल, फवारणी पंप व लाकडी बांबू असा सुमारे 12 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. दि. 1 मे रोजी सायंकाळी सहा ते 2 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान म्हैसगांव येथील वन विभाग सर्वेनंबर 130 येथील रोपवाटिका येथून 700 रु. किं. चे जुने लोखंडी 7 पत्रे, 800 रु. किं. चे लोखंडी अँगलचे 4 नग प्रत्येकी 20 फुटी असलेले, 1 हजार रु. किं. चे लोखंडी अँगलचे 10 नग प्रत्येकी अँगल 10 फुटी असलेले, 5 हजार रु. किं. ची. 5 एचपी. इलेक्ट्रीक मोटर, 2 हजार रु. किं. ची 1 एचपी. इलेक्ट्रीक मोटर, 2 हजार रु. किं. चा 1 चार्जींग फवारणी पंप, 500 रु. किं. चे लाकडी बांबू 10 नग प्रत्येकी 4 फूट असलेले असा एकूण 12 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.

या घटनेबाबत वन विभागातील कर्मचारी मदन नवनाथ गाडेकर यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गु. रजि. नं. व कलम - 370/2022 भादंवि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जानकीराम खेमनर हे करीत आहेत. चोरीची घटना घडली तेव्हा वनविभागातील अधिकारी व कर्मचारी काय करत होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Related Stories

No stories found.