टाकळीमानूर |वार्ताहर| Takalimanur

दीड महिन्यांपासून पाथर्डी तालुक्याच्या पाश्चिमेस बिबट्या धुमाकूळ घालत असताना तालुक्याच्या पूर्व भागातील भगवानगड परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचे

बर्याच व्यक्तींनी वनविभागाला कल्पना देऊनही वन विभागाने नागरिकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. त्यात भगवानगड तांड्यावर बिबट्याने महिलेवर हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे वन विभागाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

भगवान गड परिसरात या पूर्वी बिबट्याने दर्शन दिले होते. मात्र वनविभागाने दुर्लक्ष केले. या भागात यापूर्वी पिंजरा बसवला नाही. तसेच जर कोणी बिबट्या पाहिला असे सांगीतले, तर वन विभागाकडून तो तरस असेल असे सांगितले जात होते. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ बेसावध होते. मात्र, अचानक भगवान गड, लमाण तांडा येथे महिलेवर बिबट्याने हल्ला केला.

त्यामुळे आता वन विभाग जागा झाला आहे. एक पिंजरा बसवला असून तालुक्यात नेमके बिबटे किती याचा वनविभागालाच अंदाज येत नसतानाही या भागात एक पिंजरा पुरेसा नसल्याने लोकांमध्ये वनविभागाबद्दल संताप व्यक्त होत आहे. टाकळीमानूर परिसरात दोन दिवसांपासून बिबट्या पाहिला असल्याचे अनेक नागरिकांकडून सांगितले जाते.

मात्र, वनविभागाकडून कुठली खबरदारी न घेता लोकांना आधार न देता वरिष्ठांना कळल्यानंतर कारवाई करू असे सागंतात, कोणतीही काळजी न घेता, पाहणी न करता केवळ सल्ले देण्यात येत आहेत. हा प्रकार लोकांच्या जीवाशी खेळण्याचा असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.