राहाता तालुक्यात २४ तासात दोन बिबटे जेरबंद

कोल्हार पाठोपाठ पाथरे बुद्रुक येथे बिबट्या जेरबंद
बिबट्या
बिबट्या

हनुमंतगाव l वार्ताहर

तालुक्यातील कोल्हार बिबट्या जेरबंद झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. हा नर बिबट्या दोन वर्षांचा आहे.

तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील शेतकरी बबनराव कडू यांच्या शेतामध्ये रविवारी रात्री नऊ वाजण्याची सुमारास दीड वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद झाला. गेल्या एक महिन्यापासून कडू यांच्या वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याने कुत्रा, कोंबड्या यांना भक्ष्यस्थानी पाडले होते. कडू यांनी केलेल्या मागणीवरून वन विभागाने पिंजरा लावला होता.

गेले आठ दिवस बिबट्या पिंजऱ्या भोवती सावजाकडे चक्कर मारत होता. परंतु रविवारी त्यांनी पिंजऱ्यात प्रवेश केला. घटनेची माहिती मिळतच प्राणी मित्र विकास मस्के, भास्करराव कडू, प्रभाकर कडू, सुधाकर कडू, प्रथमेश कडू, समर्थ कडू यांनी पिंजरा व्यवस्थित बंद केला. वनपाल बी एस गाडे, संजय साखरे यांनी तातडीने हजर होऊन बिबट्याला लोणीच्या शासकीय रोपवाटिकेत हलविले.

यावेळी सहाय्यक कृषी सहाय्यक नितीन शिंदे, ताराचंद कडू, नरहरी घोलप, भगवान व्यास, एनडी विखे, प्रकाश दिघे, प्रवीण विखे आदी जण हजर होते. बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांनी भरपूर गर्दी केली होती. बिबट्या जेर बंद झाल्याने बबनराव कडू आणि शेजाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com