नेवासा : विनाकारण गर्दी करणार्‍यांची अ‍ॅन्टीजेन चाचणी करा

बेलपिंपळगाव येथील बैठकीत प्रांताधिकारी गणेश पवार यांची सूचना
नेवासा : विनाकारण गर्दी करणार्‍यांची  अ‍ॅन्टीजेन चाचणी करा
File Photo

बेलपिंपळगाव (वार्ताहर) - गावात विनाकारण गर्दी करणार्‍यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन तपासणी करा. नियमांचे पालन न करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा अशी सूचना प्रांताधिकारी गणेश पवार यांनी केली. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे प्रांताधिकारी गणेश पवार व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत करोनासंदर्भात बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सरपंच, उपसरपंच, करोना समिती चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले की गावात जास्त प्रमाणात बाधित सापडत असल्याने काळजी घ्यावी. विनाकारण गावात गर्दी करू नये. थोडे जरी लक्षण दिसत असतील तर ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे तसेच गावात तातडीची तपासणी करण्याची उपाय योजना सुरू करण्याचे आदेश दिले तसेच गावात जर कोणी विनाकारण गर्दी करत असेल तर अशा लोकांची रॅपिड तपासणी करून घ्यावी जर कोणी दुकानदार व नागरिक जर नियमांचे पालन करत नसेल तर अशा व्यक्तीवर रितसर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तहसीलदार सुराणा यांनी गावातील बँक तसेच इतर ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तसेच सर्वांनी मिळून गावात वार्ड प्रमाणे रुग्ण तपासणी करावी व जर कोणी संशयास्पद रुग्ण असेल तर त्याची माहिती प्रशासन द्यावी असे आवाहन केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र शेरकर, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित सुर्यवंशी, डॉ. यादव, सरपंच निकिता गटकळ, उपसरपंच बंडूपंत चौगुले, तलाठी सोपान गायकवाड, चंद्रशेखर गटकळ, माजी सरपंच राजेंद्र साठे, तंटामुक्ती अध्यक्ष भीमजी साठे, ग्रामविकास अधिकारी श्री. मिसाळ, पोलीस पाटील संजय साठे, कृष्णा शिंदे, मुख्याध्यापक कल्याण शिंदे, किरण साठे, योगेश शिंदे, किशोर गारुळे, वसंत कांगुणे, आशा सेविका आदी ग्रामस्थ व करोना समिती सदस्य उपस्थित होते.

आजपासून 8 दिवस गाव बंद

बेलपिंपळगाव शुक्रवार (28 मे) पासून आठ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद असणार आहे. गावात कोणी विनाकारण गर्दी करू नये. दवाखाना व मेडिकल सुरू असतील. भाजीपाला, किराणा दुकान तसेच इतर दुकान बंद असतील. ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. गावात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आपण घरीच राहून ग्रामपंचायतला सहकार्य करावे.

- निकिता चंद्रशेखर गटकळ, सरपंच, बेलपिंपळगाव

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com