नगरमध्ये रंगणार फुटबॉलचा थरार

नगरमध्ये रंगणार फुटबॉलचा थरार

अहमदनगर | ahmednagar -

नमोह फूटबॉल क्लबच्यावतीने ( Namoh Football Club ) शहरात16 व 17 ऑक्टोबर रोजी अहमदनगर फूटबॉल सुपर लीग (Ahmednagar Football Super League ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर क्लबच्या ( Ahmednagar Club ) मैदानावर फूटबॉल लीगच्या धर्तीवर होणार्‍या या स्पर्धेतून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.

पंधरा वर्षाखालील खेळाडूंना यात सहभागी होता येणार आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंची लिलाव पध्दतीने संघात निवड केली जाईल. सर्व खेळाडूंना तज्ज्ञांमार्फत दहा दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे, अशी माहिती नमिता फिरोदिया यांनी दिली.

स्पर्धेत एकूण 8 संघांना प्रवेश दिला जाणार आहेत. दोन ग्रुपमध्ये मिळून एकूण 100 खेळाडू यात सहभागी होतील. 9 अ साईड पध्दतीने बाद फेरीचे सामने होणार आहेत. प्रत्येक सामना 30 मिनिटांचा असणार असून 3 रोलिंग सबस्टीट्युटची संधी प्रत्येक संघाला असेल. 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत नोंदणी केलेल्या खेळाडूंना पाचारण करून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना ग्रेडस दिल्या जाणार आहेत. संघ निवड लिलाव 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत होईल. 30 सप्टेंबर रोजी टिम मालकांना स्वत:चा बॅनर दिला जाईल. प्रत्येक टिमसाठी व्यावसायिक प्रशिक्षक Instructor दिला जाणार असून प्रत्येक टिमचे दहा दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com