सणासुदीत खाद्य पदार्थांच्या किमतीत भरमसाठ वाढ

 सणासुदीत खाद्य पदार्थांच्या किमतीत भरमसाठ वाढ

राजुरी |वार्ताहर| Rahuri

सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगावे तरी कसे? असा प्रश्न सध्या पडला आहे.

गेल्या दोन वर्षापासून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, व्यापारी करोनाच्या काळात आपले संसार व व्यवहार कसेबसे चालवत आहे. आता दसर्‍यानंतर दिवाळीची चाहूल लागली असून शहरासह ग्रामीण भागातही याची थोडीफार का होईना चूणुक दिसू लागली आहे. मात्र खाद्यपदार्थांच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. या भाववाढीचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागाला होणार आहे.

किराणामधील खाद्यतेलाची 15 लिटर सोयाबीन डब्याची किंमत 2200 ते 2300 रुपये असून तूरडाळ 108 रुपये, मुगडाळ 104 रुपये, उडीदडाळ 110 रुपये, मसूर डाळ 100 रुपये, मठडाळ 130 रुपये, हरभरा दाळ 75, मटकी 108, बगर 124, शेंगदाणा 120 ते 128, वटाणा 146, बेसन 90, पोहे 50, साबुदाणा 73, गुळ 54, साखर 40, चहा पावडर 275 पासून ते 550 रुपये, मिरची 220, तूप 150, गावरान तूप 500, रवा व मैदा 30 ते 35 रुपये असे सध्या शहरांच्या मार्केटमध्ये भाव आहे. याउलट ग्रामीण भागातील दुकानदारांचे वेगळे भाव असल्याचे काही ठिकाणी जाणवत आहे. या भाववाढीमुळे ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना दिवाळीचा सण कसा साजरा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे हाताशी लागलेल्या सोयाबीन सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकर्‍याकडे सोयाबीन नसाताना दर दहा हजाराच्या वर गेले होते. त्याच सोयाबीनचा भाव आता चक्क 4000 ते 5000 हजार रुपयांवर आल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये केंद्र वर राज्य सरकारविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे. शेतकर्‍यांचे कैवारी मात्र सध्या कुणीच दिसत नाही. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हतबल झाल्याचे चित्र सध्यातरी पाहावयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com