खवय्यांना पर्वणी! शिर्डी रामनवमी उत्सवात प्रथमच फूड फेस्टिव्हल आयोजन

खवय्यांना पर्वणी! शिर्डी रामनवमी उत्सवात प्रथमच फूड फेस्टिव्हल आयोजन

शिर्डी | शहर प्रतिनिधी

जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी (Shirdi) येथील श्री साईबाबांचा (Saibaba) रामनवमी उत्सवात (Ram Navmi Ustav) यंदा प्रथमच महिलांमधील पाककला कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी फुड फेस्टिवलचे (Food Festival) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिर्डी रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली असून हा आगळावेगळा फुड फेस्टिव्हल खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

दरम्यान शिर्डी शहरातील श्री साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला श्री रामनवमी उत्सवाची महती जगभर पोहचली आहे. सन २०१८ मध्ये श्री साईसमाधी शताब्दी वर्षात विश्वविक्रमाची गवसणी घालणारा जगप्रसिद्ध संत श्री गंगागीर महाराज हरिनाम सप्ताह देखील याच पुण्यभमीत झाला आहे. त्यानंतर मागील दोन वर्षे कोव्हिडच्या कारणास्तव रामनवमी उत्सव भक्तांविना साजरा करण्यात आला होता.

खवय्यांना पर्वणी! शिर्डी रामनवमी उत्सवात प्रथमच फूड फेस्टिव्हल आयोजन
शिर्डीत साकारण्यात येणार २५ हजार स्के.फुटाची भव्य रांगोळी

यंदा दोन वर्षापासून देश विदेशातील भाविक या ऐतिहासिक रामनवमी उत्सवात सहभागी होणार आहे. त्याअनुषंगाने श्री साईबाबा संस्थान तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी भाविकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार दि.११ एप्रिल ते बुधवार दि.१३ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत एअरपोर्ट रोडलगत असलेल्या द्वारकामाई भक्तनिवास शेजारच्या भव्य मैदानावर अनोख्या पदार्थांसाठी फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

खवय्यांना पर्वणी! शिर्डी रामनवमी उत्सवात प्रथमच फूड फेस्टिव्हल आयोजन
शिर्डीत रंगणार भव्य कुस्त्यांची दंगल; रांगडे पैलवान शड्डू ठोकून तयार

झटपट तयार होणा-या खाद्यपदार्थांतून महिलांच्या पाककलेचा अविष्कार पहायला मिळणार असून यातून दैनंदिन जीवनात खाण्यासाठी लागणारे पदार्थ चविष्ट आणी दर्जेदार, पौष्टिक असण्याच्या उद्देशाने पाककलेत कुशल असलेल्या महिलांसाठी या आगळ्यावेगळ्या फुडफेस्टीवलचे आयोजन केले आहे. पाककलेत महिला निपून असतातच परंतु या कलेच्या माध्यमातून अनेकविध प्रयोग करतांना विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा प्रयत्न काही महिला करत असतात. त्यांच्या अशा प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शिर्डी रामनवमी उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असल्याचे फुड फेस्टिव्हल कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र शेळके यांनी सांगितले.

खवय्यांना पर्वणी! शिर्डी रामनवमी उत्सवात प्रथमच फूड फेस्टिव्हल आयोजन
साईबाबांचे दर्शन होणार सुलभ! बायोमेट्रिक पास 'या' तारखेपासून होणार बंद

यासाठी कमिटीचे उपाध्यक्ष अजित पारख, डॉ धनंजय जगताप, महेश वैद्य, प्रसाद वेद, संजय शिर्डीकर, विशाल तिडके, सुरेंद्र महाले, विष्णुपंत थोरात, जयंतीभाई पटेल, रविकिरण डाके, विशाल कोळपकर, बबलू वर्पे, आकाश त्रिपाठी, आकाश वाडेकर, भरत दवंगे, ग्रीन एन क्लिन फाउंडेशन शिर्डी, शिर्डी रोटरी क्लब ऑफ शिर्डी, लायन्स क्लब शिर्डी, स्वस्तिश्री परिवार, साईकृपा महिला मंडळ आदी परिश्रम घेत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com