
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सावेडी नाका परिसरात असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास बुधवारी सायंकाळी आग लागली. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. सावेडी नाका येथे अन्न व औषध प्रशासनाचे खासगी जागेत कार्यालय आहे.
बुधवारी नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज सुरू होते. सायंकाळी साडे सहा वाजता कार्यालयातील वरच्या मजल्यावरील खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत फर्निचर जळून खाक झाले आहे.
यामध्ये कोणतेही कागदपत्रे जळाली नसल्याचे उपायुक्त शिंदे यांनी सांगितले. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.