धुक्यात हरवली वाट!

धुक्यात हरवली वाट!

चांदेकसारे परिसरात धुक्याची चादर..

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यात धुक्याची चादर पसरली होती. हे धुके इतके दाट होते की वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण झाले. सकाळी दहापर्यंत वाहनचालकांनी आपापली वाहने रस्त्यावरच उभी करून धुके निवरण्याची वाट बघितली.

धुक्यात हरवली वाट!
आरोग्य केंद्राच्या गेट समोरच कडाक्याच्या थंडीत महिलेची प्रसुती

गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात थंडी व दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिन्नर शिर्डी महामार्गा दरम्यान सकाळी दहा वाजेपर्यंत धुक्यातून वाट काढणे वाहनचालकांना कठीण बनले होते. त्यामुळे त्यांनी आपली वाहने रस्त्यावर उभी करून दिली होती.

धुक्यात हरवली वाट!
सोनाली कुलकर्णीचा मकरसंक्रातीनिमित्तचा लूक पाहिलात का...

या धूक्यामुळे कांदा व गहू पिकांवर माव्याचा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती यामुळे निर्माण झाले आहे. धुक्याचे प्रमाण इतके जास्त होते की सकाळी साधारण अकरा वाजेपर्यंत धुके कायम राहिले.

धुक्यात हरवली वाट!
PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com