
घारगाव |वार्ताहर| Ghargav
संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील सावरगाव घुले येथील अशोक कारभारी घुले या शेतकर्याच्या घरा शेजारी असलेल्या जनावरांच्या चार्याला भीषण आग लागल्याची घटना शनिवार (ता.30 एप्रिल) रोजी दुपारी घडली. या आगीत संपूर्ण चारा जळून खाक झाला असून आगीचा फटका घरालाही बसला आहे. त्यामुळे घुले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अशोक घुले यांच्या घराशेजारीच जनावरांचा चारा होता मात्र शनिवारी दुपारी ही आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्र अवतार धारण केले. आग लागल्याचे समजताच गावातील ग्रामस्थ, युवक यांनी आगीच्या दिशेने धाव घेतली. दोन तासांनी ही आग आटोक्यात आण्यात यश सर्वांना यश आले. संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं होतं, ही आग नक्की कशाने लागली याचं कारण अद्यापही समजू शकले नाही घटनेची माहिती तलाठी श्री. ताजणे यांना समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
या आगीत अशोक घुले यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांना मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, घटनास्थळी छात्रभारती चे कार्यकर्ते, गावातील युवक, ग्रामस्थ, यांनी मोठ्या शर्तीने ही आग विझवली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही असे असले तरी घुले यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा संपूर्ण जळून खाक झाला आहे. त्यामुळे आता जनावरांना चारा कुठून आणायचा असा प्रश्न घुले यांच्यापुढे निर्माण झाला आहे.