सार्वमत
जनावरांचा चारा पेटवून देऊन शेतकर्याचे नुकसान
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जनावरांसाठी राहत्या घरात ठेवलेले सरकी पेंंड व भुसा अज्ञात व्यक्तीने पेटवून देत शेतकर्याचे नुकसान केले आहे. नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुमार परशुराम झरेकर (वय 57 रा. घोसपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये त्यांच्या जनावरांच्या चार्यासाठी सरकी पेंड व भुसा साठवून ठेवला होता. अज्ञात व्यक्तीने रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास सरकी पेंड व भुसा पेटवून दिला. झरेकर यांनी सोमवारी सकाळी नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.