नेवासा : पुराच्या पाण्यात महिला गेली वाहून

नेवासा : पुराच्या पाण्यात महिला गेली वाहून

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील मुकींदपुर (Mukindpur) येथील 27 वर्षीय महिला (woman) ओढ्याचे पुराचे पाण्यात वाहून गेल्याची (woman was carried away) घटना आज दि.2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली असून बचाव कार्य सुरू असून अद्याप ही या महिलेचा तपास लागलेला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा पोलीस ठाण्याच्या (Newasa Police Station) हद्दीतील रोहिणी रमेश घुगे (वय 27 वर्षे) राहणार मुकिंदपुर ही महिला नागझरी ओढा, नेवासा खुर्द (Newasa) येथे आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेली असता पुराचे पाण्यात वाहून गेली आहे. बचाव पथकाच्या मदतीने सदर महिलेचा शोध घेण्याचे कार्य सुरू असून संध्याकाळ होऊन ही अद्याप पर्यंत लागला नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.