पुरातही बंधार्‍याचे ठापे न काढल्यानेच शेतीचे लाखो रूपयांचे नुकसान

पाटबंधारेच्या अधिकार्‍यांवर कारवाईची शेतकर्‍यांची मागणी
पुरातही बंधार्‍याचे ठापे न काढल्यानेच शेतीचे लाखो रूपयांचे नुकसान

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील सामनगाव येथील ढोरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-याच्या संपूर्ण फळया पावसाळ्यात देखील न काढल्याने शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान होत असून पुराचा फटका यामुळे बसला आहे. यास पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी दोषी आहेत. बंधार्‍याच्या सर्व गेटच्या फळया त्वरीत पुर्णपणे काढून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

सामनगाव येथील ढोरा नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. त्यात मागील वर्षी पाणी साठवण्यासाठी टाकलेल्या फळयांपैकी काही गेटवरील फळया पूर्णपणे काढलेल्या नाहीत. खालच्या बाजूने दोन तीन फळ्या कायम ठेवून काठच्या दोन्ही बाजुच्या गेटवरील मात्र सर्व फळया तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. सध्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यात मोठया प्रमाणावर पाऊस होत असून ढोरा नदीला मोठया प्रमाणावर पाणी येत आहे. 31 आँगस्ट रोजी नदीला मोठा पूर आला होता. त्यावेळी देखील बंधा-यात गेल्या वर्षी टाकलेल्या 17 पैकी 6 गेटच्या संपूर्ण फळया तशाच आहेत. व इतर 11 गेटमध्ये प्रत्येकी 2 फळया देखील तशाच आहेत. याचा मोठा फटाक नदीकाठच्या शेतीला बसला असून मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. बंधा-याच्या दोन्ही बाजुचा भराव वाहून गेला आहे. तर जमिनीत देखील 200 ते 250 फुटापर्यत तडे गेलेले आहेत. तसेच अवैध वाळूउपसा करणारांनी बंधा-यातील नदी पात्र पूर्णपणे खिळखिळे करुन टाकले आहे.

बंदा-यात पाणी आडवण्यासाठी दहा आक्टोबर नंतर मुळा पाटबंधारे विभागाकडून फळया टाकल्या जातात. मात्र उन्हयाळ्यात पाणी अटल्यानंतर त्या पूर्णपणे काढून टाकण्याकडे संबंधीत विभागाचा कानाडोळा होतो. त्यामुळे दरवर्षी पाऊस सुरु होताच आजूबाजूच्या शेतक-यांमध्ये नदीच्या व पूराच्या पाण्याबाबत धाकधुक सुरु होते.

यावर्षी देखील मोठया प्रमाणावर पाऊस सुरु असून ढोरा नदी एक महिन्यापासून तुटूंब भरुन वाहत आहे. त्यामुळे बंधा-यातील फळयांचा जास्त आलेल्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून ते पाणी आजूबाजूच्या शेतात शिरुन नुकसान होत आहे. त्यामुळे या फळया त्वरीत काढून दोन्ही बाजूला संरक्षक भिंतीलगत भराव टाकण्यात यावा. अशी मागणी येथील शेतकरी मुरलीधर झाडे यांनी निवेदनाव्दारे मुळा पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

या बंधार्‍याच्या संदर्भात येथील शेतकरी अनेक वर्षापासून मुळा पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र प्रत्येक वेळी पाटबंधारे, महसुल, सिना प्रकल्प एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम करत आहेत. मात्र पुराने नदीकिनारील शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. अधिकार्‍यांच्या चालढकलीमुळे पूराच्या पाण्याचा परिसरातील शेतीला व गावाला मोठा अनपेक्षीत फटका बसत आहे.

- मुरलीधर झाडे, शेतकरी सामनगाव

Related Stories

No stories found.