पुरात अडीच हजार जनावरे दगावली

सभापती गडाख : 14 व्या वित्त आयोगातून मदत देण्याचा प्रयत्न
 सभापती सुनील गडाख
सभापती सुनील गडाख

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात शेवगाव-पाथर्डीसह (Shevgav-Pathardi) अन्य ठिकाणी पूर (Flood) आणि अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) 2 हजार 470 जनावरे दगावली (Animals Death) आहेत. त्यांना जिल्हा परिषदेमार्फत (Zilla Parishad) मदत देणे शक्य वाटत नाही. मात्र, वित्त आयोगाच्या निधीतून (Finance Commission funds) या दगावलेल्या जनावरांचे मालक असणार्‍या शेतकर्‍यांना मदत देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अर्थ आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख (Animal Husbandry Committee Speakar Sunil Gadakh) यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सभापती गडाख (Animal Husbandry Committee Speakar Sunil Gadakh) बोलत होते. दरम्यान, यावेळी केलवड (Kelwad) येथील गायी दगावल्याचा विषय सदस्या शालिनीताई विखे पाटील (Member Shalinitai Vikhe Patil) यांनी उपस्थित केला. त्या ठिकाणी असणारे जनावरांचे डॉक्टर यांनी लसीकरण न केल्याने मोठ्या संख्याने गायी दगावल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे संबंधित पशु पालकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण न करणार्‍या संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी त्यांनी केली.

यावेळी प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हरिश्चंद्रे यांनी केलवडबाबत सभेत माहिती दिली.

त्या ठिकाणी लाळ्या खुरकूतमुळे गायी दगावल्या (Scabies Problem Cow Death) नसल्या तरी लाळ्या खुरकूतमुळे (Scabies) गायींची प्रतिकार शक्ती कमी होवून त्यांना घटसर्पची बाधा झाल्याचे सांगितले. या ठिकाणी 16 गायी, 6 कालवडी आणि काही शेळ्या मृत झाल्या असून राहाता तालुक्यात अवघे 11 टक्के जनावरांचे लसीकरण झाल्याची माहिती दिली. त्यावर सभापती गडाख (Speakar Sunil Gadakh) यांनी तातडीने पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हरिश्चंद्रे यांनी केलवडला परत जाऊन वस्तुनिष्ठ माहिती घेवून येण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

अलिबाग सहलीवर आक्षेप

जिल्हा परिषद सदस्यांचा अलिबागला दोन दिवसीय अभ्यास दौरा असून या दौर्‍याला सदस्य जालींदर वाकचौरे, अजय फटांगरे यांनी विरोध केला. फटांगरे यांनी सहलीच्या 18 लाखांच्या खर्चाऐवजी त्या पैशातून सौर दिवे घ्यावेत, अशी मागणी केली. तर ऐन सणसुदीच्या काळात सहल का काढली, याबाबत शालिनीताई विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला.

सभा संपताच सदस्य अलिबागला रवाना

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपताच पदाधिकारी, सदस्यांनी अलिबागच्या दिशेने कूच केली. या सहलीत पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी-कर्मचारी अशा 60 जणांचा समावेश आहे. काही पदाधिकारी स्वत:च्या वाहनाने अलिबागला निघाले असून ते सकाळी अभ्यास दौर्‍यात सहभागी होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी यांनी दिली.

सभेत सदस्य जालींदर वाकचौरे यांनी नेवासा तालुक्यात महिला बचत गटातील महिलेला कर्ज मंजुरीसाठी कागदपत्रे पुर्तता करण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केल्याची ऑडिओ क्लीप असल्याचे सांगितले. त्यावर ठोस पुरावा द्या, कोणीही असू द्या, संबंधित झेडपी कर्मचार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश सभापती गडाख यांनी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com