वडुले येथे दहावी व बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण

वडुले येथे दहावी व बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण

नेवासा (का.प्रतिनिधी)

नेवासा तालुक्यातील वडुले येथे दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहण करण्यात आले प्रथम आलेल्या विद्यार्थिनी सपना भारत भगत व ऋतुजा शिवराम आरोटे यांना सरपंच व उपसरपंच यांनी हा मान दिला.

यावेळी सरपंच दिनकरराव गर्जे, उपसरपंच अर्चना देवढे, माजी सरपंच बाबासाहेब आतकरे, ज्ञानेश्वर देवढे, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव सरोदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास पवार, सचिव सयाजी देवढे , साहेबराव गर्जे, भारत भगत , शिवराम आरोटे, बाबा साहेब नरोटे, संदिप भागवत , बाळासाहेब पवार, पोलिस पाटील आप्पासाहेब गर्जे, मुख्याध्यापक ए.सी.राव , संजय कातोरे, भवानी बिरु, अंगणवाडी सेविका कमल गर्जे , सारिका गर्जे, साधना जाधव , आशा स्वंयसेविका संगिता ढगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार पंडितराव राठोड यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com