संशयितरित्या फिरणार्‍या पाच जणांना अटक

नगर तालुका पोलिसांची आगडगावात कारवाई
संशयितरित्या फिरणार्‍या पाच जणांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगडगाव (ता. नगर) येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात संशयितरित्या फिरणार्‍या पाच आरोपींना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. बाळकृष्ण नामदेव खताळ (वय 26 रा. आडगाव ता. पाथर्डी), प्रदीप बाबासाहेब खेमनर (वय 23), किशोर उत्तम कुसळकर (वय 28 दोघे रा. माका ता. नगर), दत्तात्रय भागवत म्हस्के (वय 25 रा. रेणुकावाडी ता. पाथर्डी), दीपक मोहन तोगे (वय 31 रा. मिरी ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी सहायक फौजदार भास्कर लबडे यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री आरोपी हे त्यांच्या तोंडाला रूमाल व उपरने बांधून त्यांची ओळख लपून त्यांच्या ताब्यातील स्वीफ्ट कार (एमएच 12 जीव्ही 5702) मध्ये फिरत होते. याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे निरीक्षक सानप यांनी पथकासह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील आरोपी काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरताना मिळून आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पालवे करीत आहेत.

Related Stories

No stories found.