बिबट्याच्या हल्ल्यात पाच मेंढ्या ठार

पारनेर तालुक्यातील पिंप्री जलेसन येथे घटना
बिबट्याच्या हल्ल्यात पाच मेंढ्या ठार

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे रिमझिम पावसात बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये 5 मेंढ्यांचा जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि 22) मध्यरात्री घडली.

तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी मच्छिंद्र नानाभाऊ शेळके हे आपल्या पाळीव शेळ्या व मेंढ्यासह काळेवस्तीनजिक शेतात रात्रीच्या मुक्कामास होते. बुधवारी सांयकाळ पासून पावसाची रिमझिम सुरूच होती. पहाटेपर्यंत ही रिमझिम सुरूच होती. रिमझिम पावसाने शेतकर्‍यांचे पाळीव कुत्रे देखील आडोशाला बसले असल्याने बिबट्याने या कळपावर हल्ला केला.

शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने व कुत्रे भुकायला लागल्याने हा प्रकार शेतकर्‍यांच्या लक्षात आला. यामध्ये 5 पाळीव मेंढ्या जखमी होऊन मृत्यमुखी पडल्या. सुमारे 30 ते 35 हजारांची नुकसान शेतकर्‍याची झाली असून तातडीने शासनस्तरावरून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ झावरे व वनविभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी सरपंच सुरेश काळे यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com