लोणीमध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती करोनाबधित
सार्वमत

लोणीमध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती करोनाबधित

संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु

Nilesh Jadhav

लोणी | Loni

लोणी बुद्रुक मधील किराणा माल व्यापारी आणि त्याच्या कुटुंबातील पाच व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे.

त्या कुटुंबातील सून रक्षाबंधनासाठी परगावी गेली होती. तिथे तिला करोना संसर्ग झाला. गावावरून परत आल्यानंतर सूनबाईकडूनच कुटुंबियांना संसर्ग झाल्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे. व्यापाऱ्याच्या तीन दुकानातून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु असून कुटुंबातील दंत वैद्यक बाधित निघाल्याने उपचार घेतलेल्या रुग्णांचाही शोध सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com