करोनामुळे मृत चर्मकार बांधवांच्या वारसांना व्यवसायासाठी पाच लाखांचे कर्ज

माहिती पाठविण्याचे तडवी यांचे आवाहन
करोनामुळे मृत चर्मकार बांधवांच्या वारसांना व्यवसायासाठी पाच लाखांचे कर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी (charmakar community) नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. यात कोविड महामारीमुळे ज्या कुटूंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यु पावली आहे, अशा कुटूंबातील वारसदारास एनएसएफडीसी यांच्या मार्फत 5 लाखांपर्यंत व्यवसायासाठी कर्ज (loan) देण्याची योजना विचाराधीन आहे.

कोविडच्या प्रादूर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटूंबातील व्यक्तीस या अनुषंगाने कार्यवाही करावयाची असेल तर त्यांनी माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. तडवी यांनी केले आहे.

या योजनेत एनएसएफडीसी कर्ज रुपये 4 लाख व भांडवली अनुदान रुपये 1 लाख, त्याचा व्याज दर 6 टक्के प्रमाणे असून माहिती सादर करताना कोविडमुळे मयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात, पोट जात, मृत्युचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्युचा दाखला, कुटूंबातील व्यक्तींची एकुण संख्या, कुटूंबातील प्रमुख वारसदार, कुटूंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न (रुपये 3 लाखाच्या आत) असणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com