बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतमजुराच्या कुटुंबियांस पाच लाखांची मदत

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतमजुराच्या कुटुंबियांस पाच लाखांची मदत

अकोले (प्रतिनिधी) / akole - अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथिल बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतमजुराच्या कुटुंबियांस वनविभागाच्या वतीने पाच लाखांची मदतीचा धनादेश नुकताच सुपुर्त करण्यात आला.

संतोष कारभारी गावंडे हा शेतमजूर धुमाळवाडी येथे शेतकामाला गेला असता आपले काम उरकुन घरी परतत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यानंतर वनविभागाने तातडीने पाठपुरावा करत तातडीने या कुटुंबास मदतीचा पहिला टप्पा म्हणून पाच लाख रुपयाचा धनादेश आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते मयताच्या पत्नी सीताबाई गावंडे व त्यांच्या वारसांना देण्यात आला.

मयत शेत मजूराच्या कुटुंबियांना पंधरा लाख मदत वन खात्याकडून देणार असल्याची माहिती अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती भाग्यश्री पोले यांनी दिली. या घटनेची पहाणी करून पिडीत कुटुंबाला लवकरात लवकर सर्वतोपरी आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन नाशिकचे मुख्य वनरक्षक नितीन गुदगे व उपविभागीय वनाधिकारी संगमनेर आनंद रेड्डी येल्लो यांनी दिले होते.

हा धनादेश सुपूर्द करण्याच्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, उद्योजक सुरेश गडाख, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा स्वाती शेणकर, आप्पासाहेब आवारी, बाळासाहेब भोर, बाळासाहेब आवारी, ईश्‍वर वाकचौरे, अक्षय आभाळे, प्रमोद मंडलिक, सरपंच पूनम आवारी, उपसरपंच गणेश पापळ, धुमाळवाडीचे सरपंच डॉ. रवींद्र गोर्डे, किसन आवारी, नीता आवारी, भाग्यश्री विजय आवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com