
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
तुळजापुर येथे दर्शन घेऊन जामखेड कडे जाणार्या भरधाव स्विफ्ट डिझायर (गाडी क्रमांक एम. एच.13 टीसी 246 ) गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खोल खड्ड्यात पालटी झाली. ही घटना सकाळी 8 वाजता घडली. यात पाच भाविक जखमी झाले असून यातील एकाची स्थिती गंभीर आहे.
यामध्ये जामखेड येथील अभिषेक अंधारे (22), गौरव जाधव (24), अक्षय पवार (23), अक्षय जाधव (23) अशी जखमींची नावे आहेत. त्यातील एकजण गंभीर जखमी झालेला असून त्याचे नाव समजू शकले नाही. गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातस्थळी महाजनवाडी येथील शिवाजी घरत, लिंबागणेश येथिल विक्की वाणी व त्यांच्या सहकार्यांनी जखमीला गाडीच्या बाहेर काढण्यास मदत केली. घटनास्थळी मांजरसुंभा येथील राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्रातील कर्मचारी ठोंबरे, मेहत्रे, राठोड पोलीस नाईक थोरात, उबे कॉन्स्टेबल पोहचले. त्यांनी सविस्तर माहीती घेतली. जखमींना रुग्णवाहीकेद्वारे बीड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.