अहमदनगर (प्रतिनिधी) -

निधी आभावी रेंगाळलेले सावेडीतील नाट्यगृहाचे काम आता वेगाने पूर्णत्वाकडे जाणार आहे. नगरोत्थान योजनेतील पाच कोटी रुपये

नाट्यगृहासाठी वळविण्यात आले आहेत. कलेक्टर राजेंद्र भोसले यांनी नाट्यगृहाच्या 8 कोटी 98 लाख रुपयांच्या निधी खर्चास आज शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली.

मार्च 2010 मध्ये नगरच्या नाट्यगृहासाठी शासनाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यासाठी 12 कोटी 73 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित ंहोता. निधी अभावी नाट्यगृहाचे काम रेंगाळले होते. अमदार संग्राम जगताप यांनी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय नियोजन मंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नाट्यगृहासाठी निधी मागितला होता.

त्यावेळी पवार यांनी तत्काळ 9 कोटी रुपयांचा निधी देण्याला मंजुरी दिली होती. त्यानुसार आज कलेक्टर राजेंद्र भोसले यांनी नाट्यगृहाच्या 8 कोटी 98 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यात खास बाब म्हणून सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेचा 5 कोटी, महापालिकेचा हिस्सा म्हणून 1 कोटी 50 लाख आणि महापालिकेने अतिरिक्त उभारवयाचा निधी म्हणून 2 कोटी 48 लाख रुपयांचा उल्लेख आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या बैठकीत 9 कोटी रूपये नाट्यगृहाला देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार हा निधी मिळाला आहे. आता नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून नगरकर नाट्यरसिकांना सुसज्ज, प्रशस्त नाट्यगृह लवकरच मिळणार आहे.

- आ. संग्राम जगताप

पालिकेवर 4 कोटींचा भार

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर नाट्यगृहासाठी पाच कोटी रुपयांचा निधी तत्काळ मिळणार असून महापालिकेला दीड कोटी रूपयांचा हिस्सा त्यात टाकावा लागणार आहे. याशिवाय अडीच कोटी नव्याने उभारावे लागणार आहेत. आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर 9 कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याने नाट्यगृहाच्या निधीचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.