श्रीरामपुरमध्ये ५ करोना रुग्णांची वाढ

अभियंत्याच्या संपर्कातील शिर्डीतील एकाला करोना
Corona
Corona

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरात काल 5 जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात सोमवारी करोना पॉझिटिव्ह आलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या कुटुंबातील चार व त्यांच्या चालकाचा समावेश आहे. एकाच दिवशी एकदम पाच रुग्ण आढळून आल्याने शहरात एक चिंतेचा विषय बनला आहे.

मंगळवारी पाठविलेल्या 17 करोना चाचणी अहवालापैकी 11 अहवाल काल प्राप्त झाले यातील पाच पॉझिटिव्ह आले असून यात या अभियंत्यांची पत्नीसह दोन महिला व दोन मुलांचा समावेश आहे. तर सहा निगेटीव्ह अहवाल आले आहेत. यातील चार जणांचे अहवाल येणे बाकी आहे. अद्याप 20 अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच, काल रात्री प्रभाग क्रमांक दोनमधून एका संशयिताला तपासणीसाठी नगरला हलविले आहे. शहरासह तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा आता 19 वर पोचला आहे.

दरम्यान, खैरी निमगाव येथील कोरोनाबाधित तरुणीच्या थेट संपर्कातील वधू-वरासह 13 जण व प्रभाग दोनमधील 70 वर्षीय बाधित महिलेच्या संपर्कातील तीन, मातुलठाण येथील तरुणासह एकूण 20 जणांचे तपासणी अहवाल बाकी आहेत.

महावितरण अधिकार्‍याच्या कुटुंबातील मोलकरणीसह तिच्या दोन मुलांच्या घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले आहेत. ही मोलकरीण शहरातील एका खासगी रुग्णालयासह विविध ठिकाणी काम करीत असल्याचे सांगितले जाते. काल दुपारी हे अहवाल प्राप्त होताच नगरपालिकेच्या वतीने या भागात फवारणी करण्यात आली. तसेच आरोग्य विभागाच्यावतीने शेजारच्या घरोघरी जावून सर्व्हे करून तपासणी करण्यात आली.

संबंधित अधिकार्‍याने मागील आठवड्यात सहकार्‍यासह लोकप्रतिनिधी आ. लहू कानडे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. या बैठकीस लोकप्रतिनिधींसह 13 जण उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांना प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com