Corona
Corona
सार्वमत

अकोले तालुक्यात पाच करोनाबाधित

एकूण 63 रुग्ण संख्या तर 45 अहवालांची प्रतीक्षा

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले तालुक्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल तालुक्यातील पाचजण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात अकोले शहर व कळंब येथील प्रत्येकी एक आणि बहिरवाडी येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांच्या एकूण संख्येने साठी पार केली आहे. एका पक्षाच्या पदाधिकार्‍याच्या कुटुंबातील व्यक्तीसह 40 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे अगस्ति कारखाना रोड परिसरात समाधानाचे वातावरण आहे. अद्याप 45 अहवालांची अकोलेकरांना प्रतीक्षा आहे.

अकोले तालुक्यात दोन दिवासांच्या विश्रांतीनंतर काल पुन्हा करोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवार व रविवार एकही रुग्ण पॅाझिटिव्ह आला नव्हता. काल सकाळी तब्बल सात जणांनी करोनावर मात केल्याची दिलासादायक बाब तालुुुुक्यासाठी होती.

मात्र दुपारी अहमदनगर येथील शासकीय प्रयोग शाळेतील अहवालात तालुक्यातील पाच व्यक्ती बाधित आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये शहरातील परखतपूर रोडवरील बाधितांच्या संपर्कातील 14 वर्षीय मुलगी व बहिरवाडी येथील दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तीची 32 वर्षीय पत्नी, 15 वर्षीय मुलगी व संपर्कातील 24 वर्षीय तरुण,तसेच कळंब येथील 34 वर्षीय महिला अशा एकूण 5 जणाचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.

तर एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याचा दोन दिवसांपूर्वी अहवाल पॅाझिटिव्ह आल्यानंतर कारखाना रोड परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते.

शनिवारी या पदाधिकार्‍यासह शहरातल्या व बहिरवाडी व कळंब येथील बाधित आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व संपर्कातील व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी 40 अहवाल निगेटिव्ह तर 5 अहवाल पॅाझिटिव्ह आले.

विशेष म्हणजे या पदाधिकार्‍याच्या कुटुंबातील व संपर्कातील व्यक्ती निगेटिव्ह आल्याने शहरासह कारखानारोड परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अद्याप तालुक्यातील 45 अहवालांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

तालुक्यात रुग्णांची संंख्या हळुहळू वाढत असून एकूण रुग्णसख्या 63 झाली आहे. त्यापैकी 46 जण करोनामुक्त झाले. तालुक्यातील 2 मयत तर 15 जणांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे अकोलेकरांनो सावधान! काळजी घ्या...! विनाकारण बाहेर फिरू नका...! घरी रहा... सुरक्षित रहा.. असे आवाहन प्रशासन व सामाजिक संघटनांनी केले आहे.

अकोले तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या 63 झाली आहे. आतापर्यंत अकोले शहरात-8, ब्राम्हणवाडा- 7, काळेवाडी -1, कोतूळ - 2, बोरी-2 लिंगदेव-1 लहीत-2 कळंब-2,चास- पिंपळदरी-4, चांदसुरज-1, जांभळे-5, पिंपळगाव खांड -4, वाघापूर-4, धामणगाव पाट-1, केळुंगण-1, रेडे-1, ढोकरी-1, बहिरवाडी -4, उंचखडक-1, समशेरपूर-4, देवठाण-3, विरगाव-1, पिंपळगाव निपाणी-2, धुमाळवाडी-1 अशी एकूण रुग्ण संख्या 63 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com