शाळेतील पहिले दोन आठवडे विद्यार्थ्यांसाठी ‘रिलॅक्स’

लगेच शिक्षणावर भर न देण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सुचना
शाळेतील पहिले दोन आठवडे विद्यार्थ्यांसाठी ‘रिलॅक्स’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सने (Covid Task Force) शाळा सुरू करण्यास परवानगी (Permission to start school) दिली आहे. त्यानूसार येत्या 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीपर्यंत तर शहरी भागात 8 वी ते 12 वी पर्यंत शाळा सुरू (School Start) करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) घेतला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून शाळा सुरू झाल्याबरोबर पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात थेट शिक्षणावर भर देवू नका. विद्यार्थ्यांना शाळेची सवय होवून द्या, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) शिक्षकांना दिल्या आहेत. यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पहिले दोन आठवडे विद्यार्थ्यांसाठी रिलॅक्स (Relax) राहणार आहेत.

दरम्यान, रविवारी राज्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍यांची व्हिडीओ कॅन्फरंसनव्दारे बैठक घेवून शाळा सुरू करण्यापूर्वी पूर्व तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानूसार नगर जिल्ह्यात 5 वी ते 12 वीपर्यंत वर्ग सुरू करता येणे शक्य आहे. मात्र, त्या संबंधीत गावात एक महिना आधी कोविड मुक्त आवश्यक असून ग्रामसभेचा ठराव यासह शाळा सॅनिटाझ करणे आणि अन्य उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात 5 वी ते 12 वीपर्यंत वर्ग असणार्‍या शाळांची संख्या 2 हजार 26 आहे. त्यात 3 लाख 32 हजार 617 मुले असून 2 लाख 69 हजार 896 मुली आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात 6 लाख 2 हजार 513 विद्यार्थी असून या वर्गावर अध्यापन करणार्‍या शिक्षकांची संख्या 17 हजार 795 आहे. शोलय शिक्षण विभागाच्या आदेशात शाळा सुरू झाल्यानंमर शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना शक्यतो पायी येण्यासाठी प्रोत्साहित करावे, स्कूल बस (School bus), खासगी वाहनात एका सिटवर एकच विद्यार्थ्याला बसवावे, सॅनिटायझरचा वापर करावा (Sanitizer should be used), विद्यार्थ्यांचा गृहपाठ ऑनलाईन घ्यावा (Students' homework should be taken online), वेळ असल्यास वर्गात गृहपाठ करून घ्यावा आदी सुचना केलेल्या आहेत.

प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशात प्रत्येक शाळेत शक्य झाल्या हेल्थ क्लिनिक सुरू करण्यात यावे. त्यात विद्यार्थ्यांचे नियमित तपमान तपासावे, शक्य झाल्या इच्छुक पालक डॉक्टरांची मदत घ्यावी, शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांची मदत घ्यावी. यासाठी लोकसहभाग अथवा स्थानिक निधीतून खर्च करावा.

खेळावर बंदी !

शाळा सुरू झाल्यानंतर लगचे खेळा घेवू नयेत, सध्या खेळावर बंदी ठेवावी, करोना कमी झाल्यावर काही खेळ घेण्यास हरकत नाही. मात्र, खेळाचे साहित्य सॉनिटाझ करावे, जवळीक होणारे खेळ टाळावे, क्रिकेट, शारिरिक शिक्षण आदी खेळ खेळण्यास हरकत नाही. आजारी विद्यार्थ्यांना शाळेत येवून देवून नयेत.

या विद्यार्थ्यांची घ्या काळजी

जास्त चिडचिड करणारे, रागीट, छोट्या गोष्टीने निराश होणारे, वर्गात शांत असणारे, कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे, वयाशी विसंगत वर्तुणक दर्शविणारे, शिक्षणात अमान्य घट दर्शविणारे, असाहय झालेले आणि सतत रडणारे विद्यार्थी यांची काळजी घेण्याच्या सुचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com