पहिली ते आठवीचा अभ्यास आता दूरदर्शनवर !
सार्वमत

पहिली ते आठवीचा अभ्यास आता दूरदर्शनवर !

जिल्ह्यातील हजारो पालक, विद्यार्थी घेताहेत लाभ

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

24 मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून सर्व शाळा बंद आहेत. काही शाळांनी ऑनलाईन वर्गांना सूरवात केली आहे. पण देशात असणार्‍या अनेक समस्यांमुळे अनेकांना डिजीटली शिक्षण घेणं शक्य नाहीये. कारण मस्मार्टफ मोबाइल, इंटरनेटअभावी अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला.

म्हणूनच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (एमकेसीएल) या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ नावाची मालिका काल सोमवारपासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू केली आहे. याचा नगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत.

20 जुलै सकाळी 7.30 ते 12.30 वाजेपर्यंत प्रसारित केली जाणार आहे. बालभारतीच्या इयत्ता पहिली ते आठवी अभ्यासक्रमातील सर्व पाठांवर आधारित ही मालिका आहे.मालिकेचे एकूण 480 भाग आहेत. प्रत्येक इयत्तेचा एक पाठ एका भागात असेल. प्रत्येक इयत्तेचे एकूण 60 भाग दाखवण्यात येणार आहेत. रविवारी या मालिका दाखवण्यात येणार नाही.

‘टिलीमिली’ मालिका मुलं आपल्या पालकांसोबत आता घरी बसून पाहत आहेत. शिवाय यातील भागांमध्ये विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शिकवणार्‍या काही व्यक्तींबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे.

या प्रमाणे आहे मालिका

वेळ - इयत्ता

सकाळी 7.30 ते 8.00 - आठवी

सकाळी 8.00 ते 8.30 - सातवी

सकाळी 9.00 ते 9.30 - सहावी

सकाळी 9.30 ते 10.00 - पाचवी

सकाळी 10.00 ते 10.30 - चौथी

सकाळी 10.30 ते 11 - तिसरी

सकाळी 11.30 ते दुपारी 12 - दुसरी

दुपारी 12 ते 12.30 - पहिली

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com