आधीच घसरलेले भाव आणि आता चोरीने शेतकरी हैराण! रात्रीतुन सोयाबीनची पोती गायब, लाखोंचे नुकसान

आधीच घसरलेले भाव आणि आता चोरीने शेतकरी हैराण! रात्रीतुन सोयाबीनची पोती गायब, लाखोंचे नुकसान

जामखेड | तालुका प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील मुंगेवाडी येथील शेनपट्टी शिवारात एक लाख पंचवीस हजार रुपयांचे सोयाबीन चोरीस गेल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यावर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, येथील शेतकरी विठ्ठल गोपाळघरे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दिवसभर शेतात काम करून रात्री झोपल्यानंतर खळ्यावर केलेले पंचवीस किंटल सोयाबीन तीस गोण्यांमध्ये झाकून ठेवले होते. परंतु याच गोष्टीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेऊन रातोरात एक लाख पंचवीस हजार रुपयांचे सोयाबीन चोरून नेले. सकाळी उठल्यानंतर गोपाळघरे यांनी खळ्यावर जाऊन पाहिले असता सोयाबीन चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ घरच्यांना व परिसरातील शेजाऱ्यांना माहिती दिली.

शेती व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या या गरीब शेतकऱ्यावर मोठा भुर्दंड पडला आहे, मागील काळात निसर्गाचा कोप होऊन भरपूर पाऊस झाला पाण्यात व चिखलात असणारे सोयाबीन या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने काढून झाल्यानंतर आर्थिक उत्त्पन्न सोयाबीन विकल्यानंतर त्यांना मिळणार होते. परंतु चोरट्यांनी गोण्या भरून ठेवलेल्या सोयाबीनवर डल्ला मारल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

या झालेल्या चोरीचा तपास करून विठ्ठल गोपाळघरे या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अनेकांनी केली आहे, घटना घडल्यानंतर जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलीस नाईक संभाजी शेंडे यांनी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली आहे पुढील तपास पोलीस नाईक संजय जायभाय हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com