सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्डसाठीचा पहिला टप्पा; नकाशे तयार करण्याचे काम सुरू

'कही खुशी, कही गम'
सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्डसाठीचा पहिला टप्पा; नकाशे तयार करण्याचे काम सुरू
File Photo

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

केंद्र सरकारच्या (Central Govt) महत्त्वकांक्षी अशा सुरत-नाशिक-नगर-सोलापूर सहापदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवेसाठीचा (Surat-Nashik-Nagar-Solapur Sixlane Greenfield Express Highway) पहिला टप्पा सुरू झाला असून नाशिक, नगर जिल्ह्यातील ज्या भागातून हायवे जाणार आहे त्या भागातील नकाशे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

रोडकरी समजले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी महत्वाकांक्षी म्हटलेल्या व उत्तर भारताला दक्षिण भारतातील शहरांना कमी वेळेत जोडण्यासाठी केंद्र सरकारने सुरत-हैदराबाद या ग्रीनफिल्ड हायवेची (Surat-Hyderabad Greenfield Highway) घोषणा २०१९ मध्ये करत अधिसूचना प्रसिद्ध केली होती. २०२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) हा मार्ग घोषित केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गासाठी सहा हजार कोटी खर्च अपेक्षित असल्याने सांगितले होते. आता पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील १२२ किलोमीटर तर नगर जिल्ह्यातील शंभर किलोमीटर भाग यातून जाणार आहे. या मार्गासाठी राहुरी तालुक्यातील तब्बल ४० किलोमीटर मार्ग जाणार असुन यात तालुक्यातील ३०० शेतकर्‍यांच्या बागायत जमिनी शेती व राहती घरे जानार असल्याने केंद्र सरकारच्या या मार्गाला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध होत आहे.

File Photo
...तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणार

२०१८ मध्ये नाशिक जिल्ह्य़ातील पांगरी (Pangari) ते नगर जवळील वाळकी (Walki) पर्यत केंद्रीय सर्वैक्षण पथकाने उपग्रहाच्याद्वारे आत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे (3D technology) सव्हेक्षण केले होते . या मार्गासाठी राहुरी (Rahuri) तालुक्यातील धानोरे-सोनगाव ते राहुरी (मुळानदी ) २२ कि मी राहुरी खुर्द ते डोगरगण १८ किमी असा तब्बल ४० किलोमीटर अंतर भु-संपादन करण्यात येणार आहे. सोनगाव, धानोरे, कानडगाव, कणगर, मोमीन आखाडा वराळे वस्ती, तनपुरे वस्ती, खिलारी वस्ती, उंडे वस्ती, येवले वस्ती, राहुरी खुर्द , कृषी विद्यापीठ, सडे, खंडाबे खुर्द, वांबोरी कडील भागातून हा मार्ग जाणार असुन मुख्य सहापदरी त्याच्या दोन्ही बाजूला साईट पट्ट्या व दोन लेनचा रस्ता प्रस्तावित आहे. जमिनीवर १५ फुटांवर हा महामार्ग होणार आहे.

नगर जिल्ह्यातील नगर, संगमनेर, राहाता, राहुरी या चार तालुक्यातून महामार्गातील १०० किमी अंतराचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यातील १८ राहता तालुक्यातील पाच, राहुरी तालुक्यातील २४ तर नगर तालुक्यातील ९ गावातील जमिनीचे संपादन केले जाणार आहे. राहुरी तालुक्यातील जमिनी यापूर्वी मुळा धरण, के.के. रेंजसाठी (K K Range) संपादित झाल्या आहेत.

दरम्यान , भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या विभागाचे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रीन फिल्ड एक्सप्रेस हायवेसाठी सध्या नगर, नाशिक ज्या भागातून मार्ग जाणार आहे त्या भागाचे नकाशे तयार करण्याचे काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील वनजमिनीचे भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या गटाची यादी तयार होऊन त्या भू संपादनाचे आरेखन प्राधिकरणाला सादर करून त्याची पुढील प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे सोपस्कार करण्यात येईल. येत्या दोन ते तीन महिन्यात याचे जाहीर प्रगटन वृत्तपत्रातून जाहीर केले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात भुसंपादन करावयाच्या गटातील क्षेत्र जे महामार्गात जाणार त्याचे निवाडे जाहीर करण्यात येतील. दुसरे पब्लिक नोटिफिकेशन होणार आहे. मग प्रत्यक्ष जागेची पाहणी करून खरेदी प्रक्रिया करून जमीन हस्तांतरण केले जाणार आहे. सध्या नाशिक - पुणे रेल्वे मार्गाचे भूसंपादन जलद गतीने होत असल्याने सुरत-नाशिक-नगर-सोलापूर या सहापदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसमहामार्ग बाबत लागली आहे. राहुरीतील पडीक, वनजमिनी बरोबरच बागायती जमिनीही या महामार्गात जाणार असल्याने कही खुशी कही गम असे चित्र दिसत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com