
अहमदनगर (प्रतिनिधी)
जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) निमित्ताने अहमदनगर (Ahmednagar) येथे चालू वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रीय पर्यावरण लघुपट महोत्सवाचे (National Environmental Short Film Festival) आयोजन केले आहे.
रंगभूमी मिडिया एंटरटेंन्मेट, न्यू आर्टस् महाविद्यालय आणि अहमदनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव साजरा होणार आहे. यात सुमारे २१ हजार रुपयांची बक्षिसेही ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती रंगभूमीचे कृष्णा बेलगावकर यांनी दिली.
नुकताच जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच दिवसाचं औचित्य लक्षात घेत रंगभूमी मीडियाने राष्ट्रीय पर्यावरण महोत्सवाची संकल्पना राबविली.
दिवसेंदिवस जागतिक स्तरावर होत असलेली तापमानाची वाढती नोंद, पाणी टंचाई अशा पर्यावरणाशी संबंधित अनेक वाढत्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर चिंतन करण्याची गरज भासते आहे. म्हणूनच महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतर पर्यारणप्रेमींना सहभागी होता येईल यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी सुमारे २१ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर केली असून यामध्ये सहभाग घेताना पर्यवणाशी संबंधित लघुपट, माहितीपट आणि योग्य संदेश देणारे स्वतःची निर्मिती असलेले मोबाईल व्हिडिओ पाठवावेत अशी माहिती रंगभूमी मीडियाचे संचालक कृष्णा बेलगांवकर यांनी दिली. येत्या ५ जुन रोजी, जागतिक पर्यावरण दिवशी न्यू आर्ट्स महाविद्यालयात हा महोत्सव साजरा केला जाणार असून, जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमींनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रंगभूमी मीडिया, माझी वसुंधरा अभियान, महानगरपालिका आणि न्यू आर्ट्स, कॉमर्स सायन्स महाविद्यालय अहदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला अहदनगरमधील हा पहिलाच राष्ट्रीय पर्यावरण महोत्सव असून यात सहभागी होण्यासाठी rangabhumifilmfestivalgmail.com ईमेलवर किंवा ७५५८७२९८०६ या व्हॉट्सअप नंबवर संपर्क साधावा.