पहिल्या दिवशी 1 हजार 150 शाळांची घंटा वाजली

1 लाख 61 हजार 642 विद्यार्थी पोहचले शाळेत
पहिल्या दिवशी 1 हजार 150 शाळांची घंटा वाजली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या पहिल्या लाटेपासून (first waves of the corona) बंद असणार्‍या शाळांचे दरवाजे सोमवारपासून उघडले (School Open). कोविडचा प्रभाव कमी झाल्याने शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग भरविण्यास मुभा दिली. त्यानुसार जिल्ह्यात कोविड नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी 1 हजार 150 शाळा सुरू झाल्या असून त्यात 1 लाख 61 हजार 642 आले होते.

दरम्यान, शाळा सुरू होणार (School Start) यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सूकता होती. दीड वर्षानंतर शाळेच्या चार भिंतीत बसून विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवणार होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाजत गाजत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. अनेक ठिकाणी पुष्पगुच्छ देवून शिक्षकांनी (Teacher) विद्यार्थ्यांचे स्वागतच केले. यावेळी शाळांमध्ये करोनाचे (Covid 19) सर्व नियमांचे काटेकारे पालन करण्यात येणार आले. मास्क (Mask), सॅनिटायझर (Sanitizer), विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे आदी उपाययोजनांसह अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. पहिले दोन आठवडे अध्यापन न करता विद्यार्थ्यांना शाळेसाठी मानसिकपणे तयार करण्याच्या सूचना आहेत.

काल शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शोलय पोषण विभागाचे अधिक्षक, केंद्रप्रमुख, सर्व साधन व्यक्ती (विशेष शिक्षक, विशेष तज्ज्ञ, विषय साधन व्यक्ती), तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह अन्य शासकीय विभागातील अधिकार्‍यांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्या अधिनस्त पर्यवेक्षीय अधिकारी कर्मचार्‍यांनाही शाळा भेटी करून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये शाळा सुरळीत व उत्साहवर्धक वातावरणात सुरू आहे की नाही याची खात्री करत होते.

जिल्ह्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या 1 हजार 692 शाळा असून 61 गावातील शाळा करोनामुळे बंद आहेत. सोमवारी 1 हजार 150 शाळा उघडल्या असून 4 लाख 11 हजार 928 पट संख्येपैकी 1 लाख 61 हजार 642 विद्यार्थी शाळेत हजर होते. यात सुरू झालेल्या शाळांची टक्केवारी 78.18 टक्के असून विद्यार्थ्याच्या उपस्थितीची टक्केवारी ही 37.96 टक्के आहे.

1 लाख 40 हजार संमतीपत्र

जिल्ह्यात शाळा सुरू करतांना आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठवितांना पालकांचे संमतीपत्र सक्तीचे करण्यात आले होते. त्यानूसार पहिल्या दिवशी जिल्ह्यात 1 लाख 40 हजार 842 पालकांनी संमती पत्र भरून दिलेले आहेत.

Related Stories

No stories found.