साकुरीमध्ये आढळला पहिला करोना बाधित
सार्वमत

साकुरीमध्ये आढळला पहिला करोना बाधित

बाधिताच्या संपर्कातील 10 जण विलगीकरण कक्षात

Nilesh Jadhav

राहाता | तालुका प्रतिनिधी | Rahata

राहाता तालुक्यातील साकुरी येथे पहिला करोना बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. साकुरी गावामध्ये पाच दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या परिसरात रूग्ण सापडला आहे त्या परीसरात जंतूनाशक फवारणी केली जात आहे. याबाबत माहीती तालुका आरोग्य आधीकारी डॉ संजय गायकवाड यांनी दिली.

सदर रूग्ण हा शिर्डी येथे हॉटेलवर कामास होता त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने त्याला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. तर त्याच्या कुटूंब व संपर्कात आलेल्या 10 जणांना विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून साकुरीत मोठी खबरदारी घेतली जात असताना करोनाच्या शिरकावामुळे नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com