डिझेलआभावी बसेस उभ्या राहत असतील तर ते दुर्दैव : केवटे

डिझेलआभावी बसेस उभ्या राहत असतील तर ते दुर्दैव : केवटे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| shrirampur

करोनामुळे बस सेवा बंद असल्यामुळे एसटी महामंडळ अडचणीत सापडले आहे. डिझेलअभावी बसेस डेपोत उभ्या राहत असतील तर ते दुर्दैव आहे, असे मत एसटीच्या स्थापनेतील पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांनी व्यक्त केले.

एसटी परिवहन महामंडळाच्या स्थापनेतील पहिले बस कंडक्टर लक्ष्मणराव केवटे यांचा प्रवासी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. प्राचार्य गोरख बारहाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड, उद्योजक रामेश्वर मणियार, आडते बाजार असोसिएशनचे सचिव संतोष बोरा, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षिरसागर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोहनलालजी मानधना यांच्या हस्ते केवटे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी रणजीत श्रीगोड म्हणाले, आज एसटी महामंडळाची परिस्थिती, आर्थिक नियोजन बिघडले आहे. या काळात कर्मचा़र्‍यांचे पगार वेळेवर होत नाही. महामंडळाकडे डिझेल भरण्यास पैसे नाहीत. त्यामुळे सणासुदीचा काळ असतानाही बसेस डेपोत प्रवाशांची वाट पहात उभ्या आहेत, अन बाहेर प्रवाशी बसेसची वाट पहात आहेत. ही चिंतेंची तसेच चिंतनाची बाब आहे.

यावेळी प्रवासी संघटनेचे बाबासाहेब भालेराव, जयंत देशपांडे, नरेश पांडव, पत्रकार देविदास देसाई, संतोष बोरा आदी उपस्थित होते. सुरेश केवटे यांनी स्वागत केले तर योगगुरु अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com