मंत्री गडाख यांच्या पीएवर गोळीबार

हल्लेखोरांनी झाडल्या ५ गोळ्या : पोलिसांकडून तपासाला वेग || चौघांवर गुन्हा दाखल
मंत्री गडाख यांच्या पीएवर गोळीबार

नेवासा (प्रतिनिधी)

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चार जणांसह अन्य अज्ञात दोन ते तीन इसमांनी गोळीबार केल्याप्रकरणी सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, राजळे यांना शनिवारी सायंकाळी पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल जनार्दन राजळे (वय 29) रा. लोहगाव ता. नेवासा हे दिवसभराचे काम आटोपून रात्री घरी जात असताना घोडेगाव ते लोहगाव रोडवर आरोपींनी शिवीगाळ व मारहाण करत पिस्तुलातून बेछूट गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत राजळे यांना कमरेजवळ एक गोळी, पायाला एक गोळी लागली व हाताला एक गोळी चाटून गेली.

मंत्री गडाख यांच्या पीएवर गोळीबार
जिल्हा उपनिबंधकांच्या नावे मागितली साडेतीन लाखांची लाच

काल शनिवारी जखमी राजळे यांचे भाऊ विकास राजळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, आरोपी नितीन शिरसाठ (रा. वांजोळी ता. नेवासा), बबलू लोंढे व संतोष भिंगारदिवे (दोघेही रा. घोडेगाव ता. नेवासा,) ऋषिकेश वसंत शेटे (रा. सोनई ता. नेवासा) तसेच अज्ञात दोन ते तीन इसमांनी पांढर्‍या रंगाच्या चारचाकी वाहनातून येऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून फायरिंग केली. या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 123/2022 भादवि कलम 307, 323, 504,506, 147, 148, 149 शस्त्र अधिनियम 3/27 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे करत आहेत

जखमी राजळे यांना अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्रीच उपचाराकरता दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृतीचा धोका अद्याप टळलेला नसल्याचे समजते. या घटनेनंतर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सोनईचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी राजळे यांची भेट घेतली.

मंत्री गडाख यांच्या पीएवर गोळीबार
VIDEO : जवानांनी भरलेल्या बसवर मोठा दहशतवादी हल्ला

हा हल्ला माझ्यावरच - ना. शंकरराव गडाख

हल्ला पूर्णपणे राजकीय असून मला राजकारणातून कायमचे संपविण्याचा जणू विडाच तालुक्यातील स्थानिक विरोधकांनी उचलला आहे. गेल्या काही दिवसापासून खालच्या पातळीवर आरोप, शिवीराळ भाषणे, खोट्यानाट्या केसेस आणि आता हा खूनी हल्ला. पोलीस यंत्रणा न्यायदेवता व जनता जनार्दनावर माझा पूर्णपणे विश्वास असून या हल्ल्याचे सत्य बाहेर येईल, याचा मला ठाम विश्वास आहे, असे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.