फायर सेफ्टीबाबत मनपाला जाग !

रूग्णालयांसाठी वर्षातून दोनदा ऑडिट, नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक
फायर सेफ्टीबाबत मनपाला जाग !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रूग्णालयातील अग्नितांडवाच्या (Civil Hospital Fire Case) घटनेनंतर सर्वच शासकीय यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. महापालिकेनेही (Ahmednagar Municipal Corporation) आपली जबाबदारी पार पाडण्याचे ठरवले असून त्यानुसार शहरातील खासगी रुग्णालयांना (Private Hospitals) अग्निसुरक्षेचे (Fire Safety) महत्त्व पटवून देण्यासाठी आरोग्य समितीने (Health Committee) प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी अग्निसुरक्षेसाठी रूग्णालयांनी वर्षातून दोन वेळा फायर ऑडिट (Fire Audit) करून त्याचे नाहकरत प्रमाणपत्र सादर करावे आणि आपल्या रूग्णांचे आपत्तीच्या घटनांतून संरक्षण करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

नगर जिल्हा रूग्णालयात (Civil Hospital) नुकतेच अग्नितांडव (Fire Case) घडले. यात 11 रूग्णांचा मृत्यू (Death) झाला. शा घटना नगर शहरामध्ये (Nagar City) घडू नये यासाठी मनपा व अहमदनगर महानगरपालिका (Ahmednagar Municipal Corporation) आरोग्य समितीच्यावतीने शहरातील खाजगी हॉस्पिटलची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत खाजगी हॉस्पिटलाचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे (Health Committee Chairman Dr. Sagar Borude), मनपा आरोग्य अधिकारी डॉ.सतिष राजूरकर (Municipal Health Officer Dr. Satish Rajurkar), अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ (Chief of Fire Brigade Shankar Misal) तसेच हॉस्पिटलचे डॉक्टर व अधिकारीवर्ग यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये हॉस्पिटलच्या सर्व प्रतिनिधींना अग्नितांडव संदर्भात केल्या जाणार्‍या उपाय योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीमध्ये अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ मार्गदर्शन करताना म्हणाले की, खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या अधिकृत एजन्सीद्वारे वर्षातून दोनदा फायर ऑडिट (Fire Audit) करून घ्यावे व नाहरकत प्रमाणपत्र अग्निशामक दलाला सादर करावे. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल्स ऑडिट करणे गरजेचे आहे. रूग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांना फायर संदर्भात अग्निशामक दलाच्यावतीने मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले जाईल.

आरोग्य अधिकारी डॉ. राजूरकर म्हणाले की, शहरातील सर्व हॉस्पिटल (Hospital) चालकांनी उपचाराचे दरपत्रक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावावे. पंधरा दिवसात सर्व रुग्णालयांनी दर्शनी भागात दर पत्रक लावावा व कायद्याचे सर्वांनी पालन करावे तसेच पुन्हा मनपा हद्दीमध्ये अग्नितांडवची घटना घडू नये, यासाठी त्रुटींची पूर्तता सर्व रुग्णालयांनी करावी.

प्रत्येकाने कायद्याचे काटेकोर पालन करावे. महाराष्ट्र नर्सिंग होम अ‍ॅक्ट 2021 ची अंमलबजावणी करावी. यामध्ये फायर सेफ्टी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अग्निसुरक्षेत काही त्रुटी असणार्‍यांनी ताबडतोब उपाययोजना कराव्यात, जेणेकरुन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सुरक्षितता अबाधित राहील. शहरांमध्ये अग्नितांडवसारख्या घटना घडू नये यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटलचालकांनी काळजी घ्यावी, असे प्रतिपादन डॉ. सागर बोरुडे यांनी व्यक्त केले.

- डॉ. सागर बोरुडे, अध्यक्ष, महापालिका आरोग्य समिती

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com